मुंबई – राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळत बसल्याचा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मंत्री व आमदार माजलेत, परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
लातूरमधील छावा संघटनेच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मारहाण ही गुंडगिरी असून, त्या गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील काही मंत्री व अधिकार्यांच्या हनीट्रॅप प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.