महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dhananjay Munde: जात म्हणून आमचा द्वेष केला, पण आम्ही कुणाचाही द्वेष करणार नाही” – धनंजय मुंडे यांचे ठाण्यातून जोरदार प्रत्युत्तर

ठाणे –“मी, माझा समाज, माझं कुटुंब, माझा जिल्हा यांच्यावर सातत्याने वैयक्तिक आरोप झाले. २०० दिवस माझी मीडिया ट्रायल चालली. मात्र आम्ही द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही,” अशा ठाम शब्दांत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

सकल वंजारी समाज अधिवेशन ठाण्यात पार पडले. यावेळी मुंडेंनी अनेक महिन्यांनंतर आपला संयम दाखवत जोरदार भाषण केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जात पाहून कधी राजकारण केलं नाही. ज्या दिवशी करावं लागेल, त्यादिवशी राजकारण सोडून देईन.”

गुणवत्तेवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केवळ जात पाहून लक्ष्य केल्याचा उल्लेख करत त्यांनी इशारा दिला – “आता बास! यापुढे सहन करणार नाही.”

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील वंजारी समाजातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी “एकोप्याने चालूया” असा संदेश दिला

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात