महाराष्ट्र ताज्या बातम्या

Fraud: 80 लाखांची फसवणूक – पणदरे येथील टोळीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल!

पुणे : सॉफ्टहार्ट ऑटोमेशन प्रा. लि. या कंपनीची तब्बल 80 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रमुख आरोपी हे मूळचे बारामती तालुक्यातील पणदरे गावचे असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. फसवणुकीचा प्रकार 2018 ते 2022 या काळात घडला असून, 2024 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

दाखल दोषारोपपत्रात उल्लेख केलेले आरोपी पुढीलप्रमाणे: माधव कल्याण जगताप (वय 36), धनश्री माधव जगताप (वय 33), राहुल अनिल सुलाखे, प्रशांत जयराम जगताप (वय 35), पूजा सचिन जगताप (वय 34), मीनाक्षी कदम, धर्मेंद्र रामचंद्र सुतार (वय 47)

या सर्वांविरुद्ध IPC कलम 420 (फसवणूक), 408 (विश्वासघात) आणि 34 (सहभागी गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार अशोक विठोबा वर्षे यांच्या फिर्यादीनुसार, कंपनीच्या सेल्स विभागात कार्यरत असलेल्या माधव जगताप व इतर सहकाऱ्यांनी संगनमत करून, कंपनीच्या उत्पादनांची विक्री नियोजित अधिकृत ग्राहकांना न करता अन्य कंपन्यांना परस्पर केली. त्यातून आलेली ₹79,10,499 इतकी रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता माधव जगताप, त्याची पत्नी धनश्री आणि मित्र प्रशांत यांच्या वैयक्तिक खात्यांत वळवली गेली.

यासाठी बनावट सेल्स ऑर्डर्स, बिलिंग, ERP व टॅलीमध्ये नोंद नसलेले व्यवहार आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला. हा माल पुढील कंपन्यांना विकण्यात आला होता: शेजल रेफ्रिजरेशन (संजय साहू), कॉनकॉर्ड इंजिनिअर्स, रनोमॅन लॉजिस्टिक्स, अक्षय एअरकॉन आणि रुपेश कोहली (लखनऊ)

पोलिसांनी दोषारोपपत्रात खालील प्रमुख पुरावे सादर केले आहेत: बँक खात्यांचे तपशील – आरोपींच्या खात्यात जमा झालेल्या फसवणुकीच्या रकमेचे पुरावे. विक्रीस गेलेल्या मालाचा पुरावा, इन्व्हेंटरी लॉग, ट्रान्सपोर्ट कागदपत्रे. तक्रारदार व साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब व पंचनामे, आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील, जप्त मालमत्तेचा पंचनामा व कागदपत्रे

तपासात उघड झाल्याप्रमाणे, सलग चार वर्षे आरोपींनी कंपनीचा माल व उत्पन्न अपहार करून संस्थेच्या विश्वासाला तडा दिला.

मुख्य सूत्रधार हा 2008 ते 2022 दरम्यान सॉफ्टहार्ट ऑटोमेशन प्रा. लि. मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होता. कंपनीच्या विक्री प्रणाली, स्टॉक मूव्हमेंट आणि आर्थिक व्यवहारावर त्याचा थेट अधिकार होता. त्याने त्याच्या पदाचा गैरवापर करत सहकाऱ्यांच्या मदतीने कंपनीच्या मालाची विक्री करून मिळालेली रक्कम गुप्तपणे वळवली.

दाखल दोषारोपपत्रात त्याला या फसवणूक, अपहार व विश्वासघात प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात