महाराष्ट्र ताज्या बातम्या

Aadhaar : आधार चेहरा प्रमाणीकरण उपक्रमाने गाठला नवा विक्रम — केवळ सहा महिन्यांत 100 कोटींवरून 200 कोटी व्यवहारांचा टप्पा

मुंबई : येत्या स्वातंत्र्यदिनी कागदपत्रांपासून स्वातंत्र्य मिळवणे आता फक्त एका दृष्टीक्षेपावर शक्य झाले आहे. आधार चेहरा प्रमाणीकरणामुळे आधारधारकांना कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी, कोणत्याही कागदपत्राशिवाय — त्वरित आणि सुरक्षितपणे — आपली ओळख प्रमाणित करणे शक्य झाले आहे.

सुरळीत, निर्धोक आणि कागदविरहित प्रमाणीकरणाच्या दिशेने भारताची जलद वाटचाल अधोरेखित करत, 10 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने 200 कोटी व्यवहारांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.

या नूतन प्रणालीचा स्वीकार अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. 2024 च्या मध्यात 50 कोटी व्यवहार पूर्ण झाले होते. त्यानंतर केवळ पाच महिन्यांत, जानेवारी 2025 पर्यंत, ही संख्या दुपटीने वाढून 100 कोटींवर पोहोचली. पुढील सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हीच संख्या पुन्हा दुप्पट होऊन 200 कोटींवर पोहोचली.

या यशाबद्दल UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार म्हणाले, “इतक्या कमी वेळेत 200 कोटी व्यवहारांचा टप्पा पार करणे हे रहिवासी आणि सेवा प्रदात्यांचा आधारच्या सुरक्षित, समावेशक आणि नाविन्यपूर्ण प्रमाणीकरण प्रणालीवरील विश्वासाचे प्रतीक आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 100 कोटींवरून 200 कोटी व्यवहारांपर्यंतचा प्रवास ही या प्रणालीच्या विस्तारक्षमतेची आणि देशाच्या डिजिटल सज्जतेची खात्री देणारी बाब आहे.”

ते पुढे म्हणाले, “गावांपासून ते मेट्रोपर्यंत, UIDAI सरकार, बँका आणि सेवा प्रदात्यांसह हातमिळवणी करून प्रत्येक भारतीय नागरिकाला तात्काळ, सुरक्षित आणि कोणत्याही ठिकाणाहून ओळख पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.”

सहा महिन्यांत व्यवहारांची संख्या 100 कोटींवरून 200 कोटींवर नेणारी ही झेप ‘डिजिटल इंडिया’च्या मूळ संकल्पनेला अधोरेखित करते. देशाच्या कानाकोपऱ्यात त्वरित, सुरक्षित आणि कागदविरहित ओळख पडताळणी सुलभ करून UIDAI डिजिटल प्रशासनाचा कणा मजबूत करत आहे.

हा टप्पा केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून, समावेशक तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरले गेले तर ते विभाजने कमी करते, नागरिकांना सक्षम करते आणि भारताची डिजिटल भविष्याकडे वाटचाल अधिक वेगवान करते, याचा पुरावा आहे.

Rajkaran Bureau

About Author

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात