सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धावपळ
By सचिन व्ही.
मुंबई : न्यायालयाने येत्या जानेवारीपर्यंत पालिका निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर ऐन सणासुदीच्या काळातच सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांची विभागवार फिल्डींग जोरात सुरू झाली आहे.
नेत्यांनी कार्यकर्त्यांना फर्मान काढले आहे की, “वर्षानुवर्षे सोबत असलेल्या मंडळांना उत्सव साजरा करताना कुठेही कमी पडता कामा नये”. त्यामुळे विभागातील मंडळांची विचारपूस करणे, त्यांना आर्थिक मदत करणे आणि कार्यक्रमांत राजकीय उपस्थिती दाखवणे यासाठी कार्यकर्त्यांची चळवळ वाढली आहे.
इच्छुक उमेदवारांची रेलचेल
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार विभागात सक्रीय झाले आहेत. नवरात्रोत्सवातील मंडळांना सढळ हाताने मदत करणे, दिवाळीतील दीपोत्सव कार्यक्रमात सहाय्य करणे, आणि बदल्यात मंडळांच्या कार्यक्रमात आपल्या पक्षाचा बॅनर झळकवणे — या सूत्रावर उमेदवारांची धावपळ सुरू आहे.
वार्डात वाढलेली वर्दळ
महापालिकेच्या वार्ड कार्यालयांमध्ये गेल्या साडेतीन वर्षांत राजकीय वर्दळ कमी होती. पण निवडणुकीच्या हालचाली सुरू होताच कार्यकर्त्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. माजी नगरसेवक आणि नगरसेविका पुन्हा वार्डांत दिसू लागले असून विभागीय कार्यालयांमध्ये तक्रारींचा पाढा राजकीय कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्यांसमोर वाचला जात आहे.
बॅनरबाजीचे राजकारण
मंडळातील कार्यकर्त्यांनी सांगितले की, “यावेळी मदतीचा हात पुढे येतो आहे खरा, पण बदल्यात मोठ्या बॅनरवर नेत्यांसोबत दहा कार्यकर्त्यांचे फोटो लावणे बंधनकारक केले जात आहे.” प्रत्येक मंडळाच्या कार्यक्रमात पक्षाचा बॅनर झळकला पाहिजे, अशा फर्मानामुळे कार्यकर्ते मंडळांना मदत करताना बॅनरबाजीला प्राधान्य देत आहेत.
* * * Bitcoin for free? Believe it: https://shoecareclinic.co.uk/index.php?gn9oxs * * * hs=8acca30bb9e48595c17425eb6493725c* ххх*
September 19, 2025du3p8h