मुंबई : मुंबईतील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघ आणि एच. डी. गावकर सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या चाळी व गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेवर मार्गदर्शन करणारी मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ४.३० वाजता आझाद मैदानाजवळील पत्रकार भवनाच्या सभागृहात होणार आहे. कार्यशाळेस सर्व नागरिकांना मोफत प्रवेश आहे.
दादर, परळ, लालबाग, शिवडीसह मध्य व दक्षिण मुंबईतील अनेक चाळी आणि सोसायट्या सध्या पुनर्विकासाच्या टप्प्यावर आहेत. या प्रक्रियेत कायदेशीर मार्गदर्शन, पारदर्शकता आणि वाद टाळण्यासाठी अचूक माहिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघाचे तज्ज्ञ संचालक अॅड. श्रीप्रसाद परब (बी.ई. सिव्हिल, एल.एल.एम.) पुनर्विकास प्रक्रियेवरील कायदेशीर बाबी स्पष्ट करतील. तर ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम “रहिवाशांची सामाजिक जबाबदारी” या विषयावर विचार मांडतील. यानंतर प्रश्नोत्तराचे विशेष सत्रही होणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि एच. डी. गावकर सेवा संस्था यांच्या मते, या कार्यशाळेमुळे चाळी व सोसायट्यांचे सदस्य, प्रशासक, व्यवस्थापन समित्या आणि संबंधितांना उपयुक्त मार्गदर्शन मिळेल. यामुळे पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता वाढून आपापसातील विश्वास आणि समान बंधुत्व दृढ होण्यास मदत होईल.
buy best cannabis seeds
October 1, 2025cannabis products online trusted secure