महायुती सरकार D.B. रिअॅलिटीवर मेहरबान; पर्यावरण व DCPR तरतुदींचा भंग, बांधकाम शुल्कात सवलती; BMC ला ₹100 कोटींचा तोटा — काँग्रेसचा आरोप
मुंबई : मालाड (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या डोंगराळ पट्ट्यात PAP प्रकल्पात ₹5,000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. प्रकल्प तत्काळ रद्द करून उच्चस्तरीय चौकशी व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने D.B. Realty (नावबदल: Valor Estate Pvt Ltd) ला अवाजवी लाभ दिल्याचा त्यांचा आरोप आहे.
प्रमुख आरोप (काँग्रेस)
• NDZ ते Residential: 8 मे 2018 च्या DCPR-2034 मध्ये संबंधित भूखंड No Development Zone (NDZ) असल्याचे; मात्र 12 मे 2023 रोजी राज्य शासनाने तो R-Zone मध्ये वर्गीकृत करून ‘पोलिस हाउसिंग’चे आरक्षण दिले, असा आरोप.
• Simultaneous Development: 17 ऑगस्ट 2023 रोजी नगरविकास विभागाकडून Accommodation Reservation धोरणाखाली पोलिस हाउसिंग + PAP अशी एकाच वेळी उभारणी (simultaneous) करण्यास परवानगी; “नियम पाळण्याऐवजी लाडक्या बिल्डरला दिलासा” असा दावा.
• PAP प्रस्ताव: BMC च्या टेंडरनंतर 13,347 PAP घरे (300 चौ.फुट प्रत्येकी) बांधण्याचा DB Realty चा प्रस्ताव; बदल्यात Land TDR, Construction TDR व ‘क्रेडिट नोट्स’ द्वारे मोठा फायदा मिळवण्याची यंत्रणा, असा आरोप.
• दरफुगवटा व VGF: BMC तांत्रिक समितीने एका PAP ची किंमत ₹32.21 लाख (GST वगळून) तर DB Realty ने ₹58.18 लाख (GSTसह) दाखवली; अतिरिक्त ~₹44 लाख VGF मागणीचा आरोप.
• ASR दरवाढ लाभदायक: 6 ऑक्टोबर 2024 रोजी LOA प्रक्रियेत विलंब करून ASR दर ~58% ने वाढल्याने बिल्डरला ‘क्रेडिट नोट्स’ लाभ ₹4,299.45 कोटी → ₹4,741.20 कोटी; काम न सुरू असूनही ~₹948.24 कोटींच्या क्रेडिट नोट्स व 10.44 लाख चौ.फुट जमिनीचा ताबा मिळाला, असा दावा.
• पर्यावरणीय नियमांचा भंग: प्रकल्प ESZ/NBWL निर्देश व सर्वोच्च न्यायालय आदेशांना विरोधी; BMC ने “Project of Vital Importance” दर्जा देत अनेक शुल्क/प्रीमियम सूट देऊन BMC ला ₹100 कोटीपेक्षा अधिक तोटा, असा आरोप.
खासदार गायकवाड म्हणाल्या, “NDZ भूखंडाला निवासी आरक्षण देऊन, ‘पोलिस हाउसिंग’च्या नावाखाली PAP प्रकल्प राबवून, TDR-क्रेडिट नोट्सद्वारे हजारो कोटींचा फायदा देण्याचा प्रयत्न झाला.” त्यांनी क्रेडिट नोट्स/TDRची वसुली करण्याची मागणी केली.
काँग्रेसच्या मागण्या
1. मालाड PAP प्रकल्प तत्काळ रद्द करावा.
2. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, कालबद्ध चौकशी करावी.
3. क्रेडिट नोट्स व TDR ची पूर्ण वसुली करावी.
4. संबंधित अधिकारी/जबाबदारांवर शिस्तभंगात्मक व फौजदारी कारवाई करावी.
पत्रकार परिषदेला खासदार वर्षा गायकवाड, नगरसेवक अश्रफ आजमी, मोहसिन हैदर, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस उपस्थित होते.

