महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुबार मुस्लीम मतदारांवर मविआ व मनसे मौन; राज ठाकरे यांनाही ‘व्होट जिहाद’चं दुखणं — आशिष शेलार

8 वर्गीकरणातील मतदार यादी सादर; 31 मतदारसंघांतील 2.25 लाख संभाव्य दुबार मतदारांची BJPची माहिती

मुंबई : “राज ठाकरे मराठी, हिंदू आणि भूमिपुत्र मतदारांच्या दुबार नोंदी शोधतात, पण अनेक मतदारसंघात दिसणारे मुस्लीम दुबार मतदार दिसत नाहीत. राज ठाकरे आणि मविआ दोघांनाही ‘व्होट जिहाद’चे दुखणे आहे,” असा आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

शेलार यांनी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी BJP माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

“भाजप कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही. पण मविआ आणि आता ‘नवा भिडू’ राज ठाकरे जात-धर्माचा भेद करतात. आम्ही तथ्यांसह यांना उघडे पाडणार आहोत.”

शेलार म्हणाले की, राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मतदारसंघातील मराठी मतदारांच्या दुबार नावांची चर्चा केली, पण त्याच मतदारसंघातील मुस्लीम दुबार नावांबाबत मौन ठेवले.

“तुम्ही कधी बिहारी, कधी उत्तर भारतीय, कधी जैन, कधी गुजराती आणि आता मराठींच्या दुबार नावांबाबत बोलता. मग मुस्लीम दुबार मतदार दिसत नाहीत का?” असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.

शेलार यांनी 31 विधानसभा मतदारसंघांतील आकडे सादर केले:
• एकूण मुस्लीम व ख्रिश्चन दुबार मतदार: 2,25,791
• राज्यातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये संभाव्य आकडा: 16,84,256

काही उदाहरणे:

विधानसभा मतदारसंघ दुबार मुस्लीम मतदार विजयाचा फरक
कर्जत-जामखेड (राहुल पाटील) 5,532 1,243
धावेरी (ज्योती गायकवाड) 10,689 —
मुंबादेवी (अमीन पटेल) 11,126 —
मालाड पश्चिम (अस्लम शेख) 17,007 6,227
मुंब्रा (जितेंद्र आव्हाड) 30,601 —
लातूर शहर (अमित देशमुख) 20,613 —

इतर मतदारसंघांची उदाहरणेही शेलार यांनी दिली.

ते म्हणाले, “मविआच्या ‘सत्य’ मोर्चात असत्य पसरवून लोकांना दिशाभूल केली. मतचोरीचा खोटा मुद्दा रेटून खरे गैरप्रकार लपवले जात आहेत.” “उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले, पण आम्ही आयोगाच्या वतीने बोलत नाही. फक्त वास्तव दाखवत आहोत.”

शेलार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मविआने ‘व्होट जिहाद’ची रणनीती राबवली आणि अनेक प्रामाणिक मतदारांची नावे हटवली.

“मतदार यादीत चुका असल्याचा दावा असेल तर सखोल पडताळणीसाठी समर्थन द्या. ‘दुबार मतदार दिसले तर फोडून टाकू’ असे म्हणताना पुन्हा मराठींनाच मारणार का?”

BJPची भूमिका अशी असल्याचे शेलारांनी सांगितले, “सर्वांना न्याय — कुणाचेही तुष्टीकरण नाही.”

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात