महाराष्ट्र ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले गुंतवणूकदार आणि पंतप्रधानांचे आभार X : @therajkaran मुंबई राज्यातून उद्योग बाहेरील राज्य खासकरून गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचा खोटा प्रचार (False Narrative) विरोधी पक्ष करत असले आणि तसा चुकीचा नरेटिव्ह पसरवत असले तरी ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण परकिय गुंतवणुकीच्या (FDI) ५२.४६ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. हि अत्यंत आनंदाची बातमी आहे […]

विश्लेषण ताज्या बातम्या महाराष्ट्र

Assaults on women : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण: मविआ – महायुतीच्या काळात सारखेच

X : @therajkaran मुंबई – राज्यात सर्वत्र महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याविरोधात जनमानस संतप्त आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीचा केला तर महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुतीच्या (Mahayuti) काळातील दैनंदिन सरासरी घटनांची संख्या 126 इतकीच असल्याचे लक्षात येते. 2021 या कोविडच्या लॉकडाऊन Covid pandemic) काळात सुद्धा महाराष्ट्रात प्रतिदिवशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसा भव्य पुतळा उभारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @NalawadeAnant मुंबई – मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवीच असून यासंदर्भात आमच्या सह सर्वच शिवभक्तांच्याही भावना तीव्रच आहेत. त्यामूळे याच ठिकाणी शिवरायांच्या लौकिकाला व त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने जेजे स्कूल ऑफ आर्टस (JJ School of Arts), आयआयटी (IIT), स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहासाठी महिला सहायक नेमा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

X : @therajkaran मुंबई : बदलापूर घटनेची (Badlapur incident) भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी शैक्षणिक संस्थामध्ये विशेष मोहीम राबवून मुली व महिलांच्या सुरक्षिततेबाबत (security of girls and women) उपाय योजना राबवावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी दिल्या. मुलींच्या सुरक्षीततेच्यादृष्टीने शाळांमध्ये स्वच्छतागृहापर्यंत ने-आण करण्यासाठी महिला सहायक, विद्यार्थी बस वाहतूकीमध्ये महिला सहायक […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

धैर्यशील पाटलांच्या खासदारकीमुळे रायगडात भाजपचे आमदार वाढणार! – प्रवीण दरेकर यांना विश्वास  

X : @MilindMane70 महाड – दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील (Dhairyshil Patil) यांची राज्यसभेवर खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर त्यांच्या खासदारकीचा निश्चितच उपयोग रायगड जिल्ह्यात भाजपाचे आमदार वाढवण्यासाठी होईल असा विश्वास विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपा गटनेते प्रवीण दरेकर (BJP leader Pravin Darekar) यांनी व्यक्त केला आहे. प्रवीण दरेकर रायगड (Raigad) जिल्हा दौऱ्यावर असताना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्‍यमंत्री पदावरुन त्यांचे तारे जमी पर…

भाजपा नेते आ. आशिष शेलार यांचा उध्दव ठाकरेंना टोला X : @NalawadeAnant मुंबई – आमचाच मुख्‍यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्‍गना करणाऱ्या ठाकरे गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्‍या महाविकास आघाडीच्‍या मेळाव्‍यातील चित्र समोर आले असून ज्‍याचे आमदार जास्‍त त्‍यांना मुख्‍यमंत्रीपद हा महायुतीचा (Mahayuti) फॉम्‍युला होता, हेही सत्‍य आज उध्‍दव ठाकरे बोलून गेले. […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जर्मनीत पाळणाघरात अडकलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीच्या सुटकेसाठी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत उठवला आवाज 

X : @therajkaran नवी दिल्ली – किरकोळ मारहाण केल्याचे कारण देत जर्मनी सरकारने (German Government) मुळ भारतीय कुटुंबातील साडेतीन वर्षांच्या मुलीला पालकांपासून हिरावून घेत पाळणाघरात ठेवले आहे. गेल्या ३६ महिन्यांपासून ही चिमूकली पाळणाघरात असून मुलगी परत मिळावी यासाठी पालक कायदेशीर लढाई लढत आहे, मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही. भारत सरकारने (Indian Government) याप्रकरणी मध्यस्थी करुन जर्मन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना कुणाची? ठाकरें गटाच्या याचिकेवर 19 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी!

मुबंई : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Uddhav Thackeray group) मतदारसंघात पक्षाचे बळ कसे वाढेल यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच आता ठाकरें गटाकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या (Shivsena) निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 19 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी क्लीन चीट

मुंबई : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर असणारे सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आता दिलासा मिळाला आहे. रवींद्र वायकर यांनी मुंबईतील जोगेश्वरी या भागात महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची खेळी ; भाजपचे तब्बल 16 माजी नगरसेवक शिवबंधन बांधणार!

मुंबई : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मतदारसंघात पक्षाचे बळ कसे वाढेल यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवरच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhajinagar) ठाकरेंनी भाजप (Bharatiya Janata Party) विरोधात मोठी खेळली आहे .भाजपचे तब्बल16 माजी नगरसेवक लवकरच उद्धव ठाकरे (uddhav thackeray […]