विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या जयकुमार गोरे यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर खुलासा मागवल्याची माहिती दिली महाराष्ट्र ताज्या बातम्या

जयकुमार गोरे यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावर खुलासा मागवला; सभापती राम शिंदे यांची माहिती

मुंबई : शिवसेना सदस्य बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात दिलेला हक्कभंग प्रस्ताव आपणाकडे प्राप्त झाला असून यासंदर्भात मंत्री गोरे यांच्याकडे खुलासा मागवण्यात आला आहे. तो खुलासा प्राप्त झाल्यानंतर याबाबत सभागृहात निवेदन केले जाईल, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी सभागृहात दिली. लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना ३० जून रोजी चुकीची […]

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत मुंबईच्या विकासाविषयी भाष्य करताना भाजप आमदार संजय उपाध्याय. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘मुंबई बदलते आहे’; विधानसभेत संजय उपाध्याय यांनी मांडला विकासाचा अजेंडा

मुंबई: विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होत भाजपचे बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबईतील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध मुद्दे सभागृहात मांडले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विकासकामांचे कौतुक करत विरोधकांवरही टीका केली. संपूर्ण अधिवेशनात विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासारखा कोणताही ठोस मुद्दा नव्हता. विकासाच्या विषयावर बोलण्याचे धैर्य त्यांनी […]

रोहित पवार यांनी विधानसभेत मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘मिसिंग लिंक’ की भ्रष्टाचाराची लिंक? बोगद्यातील भेगा, पाण्याचे लोट आणि दरडींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल

नवयुगा, अ‍ॅफकॉन्सच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; उच्चस्तरीय चौकशीची मागणी मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील हजारो कोटी रुपयांच्या बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्घाटनाला अवघे काही आठवडे होत असतानाच बोगद्यात भेगा, भिंतीतून पाण्याचे लोट आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. मंगळवारी विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी […]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब विधान परिषदेत नाशिक सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या निविदांबाबत चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निविदांवरून विधान परिषदेत जोरदार आरोप-प्रत्यारोप; अनिल परबांची एसआयटी चौकशीची मागणी

‘देवाला तरी सोडा…’ म्हणत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप; प्रत्येक आरोपाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू – मंत्री शिवेंद्रराजे भोसले मुंबई: २०२७ च्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या विकासकामांवरील निविदा प्रक्रियेवरून शुक्रवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर निविदा प्रक्रियेत कथित अनियमिततेचे गंभीर आरोप करत संपूर्ण […]

NCP (Sharad Pawar) leader Jayant Patil speaking during the Maharashtra Assembly debate on the Maharashtra Women Farmers Empowerment Bill 2026. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर; सरकार-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख देण्याचा सरकारचा दावा; विरोधकांकडून जमीन हक्क आणि कर्जप्रवेशावर प्रश्नचिन्ह मुंबई : राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देण्याच्या उद्देशाने आणण्यात आलेले ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६’ गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाले. मात्र विधेयक मंजूर होण्यापूर्वी झालेल्या चर्चेत सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी महिलांना प्रत्यक्ष मालकी हक्क आणि आर्थिक अधिकार न देता […]

Maharashtra Public Health Minister Prakash Abitkar addresses the Legislative Assembly while announcing recruitment of doctors and healthcare staff during the Monsoon Session. महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘डॉक्टर्स डे’ निमित्त आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा; १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश, ५ हजार पदभरतीला गती

सीएचओ भरती, बंद उपजिल्हा रुग्णालये सुरू करण्यास प्राधान्य; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत घोषणा मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठी भरती मोहीम हाती घेतली आहे. ‘डॉक्टर्स डे’च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत १,४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच ५ हजार रिक्त पदांची […]

Congress MLA Amit Deshmukh raises the demand for immediate state funding for the Nanded–Latur railway project during the Maharashtra Legislative Assembly session. महाराष्ट्र ताज्या बातम्या

नांदेड-लातूर रेल्वे प्रकल्पासाठी राज्याने तातडीने निधी द्यावा; अमित देशमुख यांची विधानसभेत जोरदार मागणी  

मुंबई : मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना जोडणारा बहुप्रतीक्षित नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकारने आपल्या वाट्याचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केली. अमित देशमुख म्हणाले की, नांदेड-लोहा-अहमदपूर-लातूर रेल्वे प्रकल्प हा दोन्ही जिल्ह्यांतील जनतेच्या गेल्या अनेक दशकांपासूनच्या अपेक्षांचा विषय आहे. तब्बल ४७ वर्षांपूर्वी माजी खासदार केशवराव धोंडगे यांनी या रेल्वेमार्गाची […]

Deputy Chief Minister Eknath Shinde and MLC Sachin Ahir address the media after Ahir joined Shiv Sena and was announced as the Mahayuti candidate for the Maharashtra Legislative Council Deputy Chairman election. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सचिन अहिर शिंदे गटात; अपात्रतेच्या मुद्द्यावर नवा कायदेशीर वाद पेटण्याची शक्यता

शिंदे गटाचा दावा – ‘हा पक्षांतराचा विषयच नाही’; ठाकरे गटाकडून कायदेशीर आव्हानाची शक्यता मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी महत्त्वाची घडामोड घडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना विधान परिषद उपसभापतीपदासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या […]

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis speaking in the Legislative Assembly while announcing stringent action, including MCOCA provisions, against organised gangs that use children for criminal activities. महाराष्ट्र ताज्या बातम्या

बालकांचा गुन्हेगारीसाठी वापर करणाऱ्यांवर मकोका; कायदा अधिक कठोर करण्यासाठी उच्चस्तरीय समिती : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: बालकांचा वापर संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, मद्यविक्री किंवा इतर गंभीर गुन्ह्यांसाठी होत असल्याचे आढळल्यास संबंधित टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांमध्ये बालकांचा वापर होत असल्याचा मुद्दा […]

Shiv Sena leader Sachin Ahir files his nomination for the Maharashtra Legislative Council Deputy Chairman election in the presence of Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde and Mahayuti leaders. महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर रिंगणात; राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना (शिंदे) कडून उमेदवारी; १ जुलैच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या १ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी मंगळवारी विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सक्रिय असलेले अहिर आता शिंदे गटाचे उमेदवार म्हणून […]