भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले उमेदवार भाजपाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपाच्या ८७ उमेदवारांपैकी तब्बल ४६ उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, हत्येचा प्रयत्न, फसवणूक, विश्वासघात, सरकारी कामात अडथळा, मारहाण तसेच राजकीय आंदोलनाशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे.
शिंदेसेनेच्या ८१ पैकी १२, उद्धव ठाकरे गटाच्या ५६ पैकी ७, मनसेच्या ११ पैकी ५, काँग्रेसच्या ३१ पैकी ४, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ४, तर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ३ उमेदवार गुन्हे दाखल असलेल्यांमध्ये आहेत.
विशेष म्हणजे भाजपाच्या ३० उमेदवारांवर थेट IPC 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
भाजपाचे आघाडीवर वादग्रस्त उमेदवार
महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या शपथपत्रांनुसार –
- प्रभाग २० मधील दिनेश जैन – तब्बल १० गुन्हे (420, विश्वासघात)
- प्रभाग २१ मधील मनोज दुबे – ९ गुन्हे
- प्रभाग १ मधील अशोक तिवारी – ८ गुन्हे (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 420)
६ गुन्हे असलेले:
माजी उपमहापौर हसमुख गेहलोत, ध्रुवकिशोर पाटील, अनिल विराणी, दीप्ती भट, अनिता पाटील
५ गुन्हे असलेले:
प्रशांत दळवी (बलात्कार प्रकरणासह), माजी महापौर डिम्पल मेहता, आनंद मांजरेकर, गणेश शेट्टी, नयना म्हात्रे, विशाल पाटील
४ गुन्हे असलेले:
वर्षा भानुशाली, सीमा शाह, हेतल परमार, मोहन म्हात्रे, रुपाली शिंदे, सुरेखा सोनार, महेश म्हात्रे
➡ वर्षा भानुशाली यांना लाचखोरी प्रकरणात ५ वर्षांचा कारावास व ५ लाख दंड झाला आहे.
३ गुन्हे असलेले:
वंदना भावसार, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, मीरादेवी यादव, संजय थेराडे, सुनीता जैन, दीपिका अरोरा, पंकज उर्फ दरोगा पांडे, भगवती शर्मा
२ गुन्हे असलेले:
ॲड. तरुण शर्मा, मुन्ना उर्फ श्रीप्रकाश सिंह, ॲड. रवी व्यास, नीला सोन्स, राकेश शाह, वंदना पाटील, स्नेहा पांडे, तुषार पारधी
➡ नीला सोन्स – बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण
१ गुन्हा असलेले:
संजय थरथरे, जयेश भोईर, ॲड. मयुरी म्हात्रे, प्रेमनाथ पाटील, नवीन सिंग, सुरेश खंडेलवाल, कुसुम गुप्ता, श्रद्धा कांबळी
➡ नवीन सिंग – बलात्कार प्रकरणात आरोपी
बंडखोर अपक्ष उमेदवार:
अनिल भोसले – ३ गुन्हे (बलात्कारासह)
गणेश भोईर – ४ गुन्हे
शिंदेसेना
८१ पैकी १२ उमेदवारांवर गुन्हे
- शंकर झा, संदीप पाटील, मुस्तफा वणारा – प्रत्येकी ५ गुन्हे
- प्रवीण पाटील – ४२० कलम
- महेश शिंदे – जुगार
- परशुराम म्हात्रे – मारहाण
- अश्विन कसोदरिया – ३ गुन्हे
- पवन घरत – २ गुन्हे
काँग्रेस
३१ पैकी ४ उमेदवारांवर गुन्हे
- प्रमोद सामंत – पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ५ गुन्हे
- अजय सिंह – हत्या, बलात्कार, फसवणूक
- ॲड. अजितकुमार गुप्ता – कौटुंबिक वादातील ३ केस
उद्धव ठाकरे गट
५६ पैकी ७ उमेदवारांवर गुन्हे
- स्नेहल सावंत – ६ गुन्हे
- सॅबी फर्नांडिस – २ गुन्हे
- दीपेश गावंड – २ गुन्हे
- राजू विश्वकर्मा – पालिका अभियंत्यावर हल्ला
मनसे
११ पैकी ५ उमेदवारांवर गुन्हे
- हेमंत सावंत – आंदोलनाशी संबंधित ३ गुन्हे
राष्ट्रवादी (अजित पवार)
- अमजद शेख – ८ गुन्हे
- शबनम शेख – ५ गुन्हे (हत्येचा प्रयत्न)
- मोझेस चिनाप्पा – ३ गुन्हे
- परवीन मोमीन – २ गुन्हे
राष्ट्रवादी (शरद पवार)
- गुलाम नबी फारुकी – २ गुन्हे
- अल्फिया फारुकी – १ गुन्हा
- ॲड. विक्रम तारे पाटील – १ गुन्हा
वंचित बहुजन आघाडी
- पंकज इंगोले – १ गुन्हा
स्वच्छ चारित्र्याचे दावे हवेतच!
प्रत्येक निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांकडून “स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार” देण्याचे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात गुन्हे दाखल असणे हेच आता उमेदवारी मिळवण्याचे प्रमुख निकष बनत असल्याचे चित्र मीरा-भाईंदर निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.
जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न असताना राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

