महाराष्ट्र ताज्या बातम्या

Davos : ‘एमओयु’चा फुगा फोडला! जुन्या करारांनाच नवे रंग, गुंतवणुकीचा बनाव?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून दावोस (स्वित्झर्लंड) येथे जाहीर करण्यात आलेले कोट्यवधींचे गुंतवणूक करार म्हणजे नवे नाहीत, तर जुनेच एमओयु पुन्हा पॅक करून विकण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

किर्दत यांनी दावोस करारांची एक-एक करून पोलखोल केली असून, सरकार फक्त आकड्यांचा खेळ करत असल्याचा दावा केला आहे.

कार्ल्सबर्ग: जुना करार, नवी जाहिरात

किर्दत म्हणाले की, कार्ल्सबर्ग कंपनीने सप्टेंबर २०२५ मध्येच दिल्ली येथे अन्न प्रक्रिया मंत्रालयासोबत १२५० कोटींचा एमओयु केला होता. या करारानुसार पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये गुंतवणूक होणार असून, महाराष्ट्रासाठी ५०० कोटींची गुंतवणूक आधीच ठरलेली होती.

“आता दावोस येथे कंपनी प्रतिनिधी तोच जुना करार सांगत आहेत आणि सरकार त्यालाच नवा एमओयु म्हणून मिरवत आहे,” असा आरोप किर्दत यांनी केला.

दहा लाख भांडवलाची कंपनी, हजारो कोटींचा करार?

योगी ग्रीन एनर्जी ही कंपनी सत्यजित तांबे व समीर पुरोहित यांची असून, या कंपनीचे अधिकृत भांडवल अवघे १० लाख रुपये असल्याचा दावा करण्यात आला.

“अशा छोट्या भांडवलाच्या कंपनीकडून मोठ्या गुंतवणुकीचे दावे म्हणजे जनतेची फसवणूक,” असा आरोप आप ने केला आहे.

बीएसएन फोर्जिंग – पालघर की सुरत?

बीएसएन फोर्जिंग कंपनी २०२० पासून पालघर येथे इंजिनिअर फ्लेंजेस तयार करते. मात्र तिचे मुख्य कार्यालय सुरत (गुजरात) येथे आहे. संचालक – बिष्णु विजय व नंदकिशोर झंवर आहेत.

“महाराष्ट्रात उद्योग आहे, पण हेड ऑफिस गुजरातला – मग फायदा कोणाला?” असा सवाल किर्दत यांनी उपस्थित केला आहे.

जपानी कंपनी, पण फायदा कोणाचा?

सुमितोमो रियालिटी ही जपानी कंपनी २०१६ पासून भारतात आहे. गुरुग्राम येथे ‘क्रिसुमी सिटी’ प्रकल्प सुरू आहे. आता मुंबईत बुलेट ट्रेन परिसरात हॉटेल, ऑफिस प्रकल्प एमएमआरडीएकडून दिले जाणार आहेत.

“हा विकास मुंबईसाठी की बिल्डर्ससाठी?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बिल्डर लॉबीला ‘सुवर्णसंधी’
• के. रहेजा – मुंबईस्थित जुनी बांधकाम कंपनी
• अल्ट्रा कॅपिटल – पंचशील रियालिटी
• प्रवर्तक – अतुल चोरडिया
• लक्झरी प्रोजेक्ट्स
• थेट एमएमआरडीए करार

“दावोस म्हणजे आता बिल्डर मेळा झाला आहे,” अशी टीका किर्दत यांनी केली आहे.

१२ कोटी गुंतवणूक, पण मोठे दावे

एसबीजी ग्रुप – सौरभ बोरा यांची कंपनी, एकूण गुंतवणूक – फक्त १२ कोटी, क्षेत्र – लॉजिस्टिक (वाहतूक, साठवणूक). गडचिरोलीतील पोलाद, पण कार्यालय अंधेरीत.

सुरजगड इस्पात – वेदांश जोशी यांची कंपनी, मुख्य कार्यालय – अंधेरी, स्टील प्रकल्प – गडचिरोली

लोढा डेव्हलपर्स – जुना एमओयु पुन्हा?

लोढा डेव्हलपर्स, प्रवर्तक – भाजप नेते मंगलप्रसाद लोढा. क्षेत्र – बांधकाम व डेटा सेंटर

“या कंपनीसोबत सप्टेंबर २०२५ मध्येच एमओयु झाला होता.
आता तोच करार दावोसला नवा म्हणून मांडला जात आहे,” असा आरोप आप ने केला आहे.

‘दावोस शो’ की गुंतवणूक वास्तव?

मुकुंद किर्दत यांनी सवाल केला की, “सरकार नवे उद्योग आणत आहे की जुने करार रंगरूप बदलून विकत आहे? हा दावोस दौरा म्हणजे फक्त जाहिरातबाजीचा तमाशा नाही ना?”
end

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात