महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड दर्शनावरून परतताना टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल; पुनाडे घाटात अपघात

१८ प्रवाशांपैकी ५ जखमी, ३ जणांना माणगाव येथे हलविले*

महाड –रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन परत जात असताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रायगडजवळील पुनाडे घाटात भीषण अपघात झाला. अवघड वळणावर वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने टेम्पो ट्रॅव्हलर उलटून हा अपघात घडला. या घटनेत प्रवास करणाऱ्या १८ प्रवाशांपैकी ५ जण जखमी झाले असून, त्यातील ३ जणांना पुढील उपचारासाठी माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अहिल्यानगर येथून MH-12-MH-6763 क्रमांकाच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून १८ शिवभक्त रायगड किल्ल्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. दर्शन आटोपून सायंकाळी माणगाव मार्गे पुण्याकडे परतीच्या प्रवासात असताना रायगड–माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात एका अवघड वळणावर टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक अचानक फेल झाला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून टेम्पो उलटला.

या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी
१) राहुल नागरे, २) अमोल फडतरे आणि ३) आसाराम तोगे
या तीन शिवभक्तांना पुढील उपचारासाठी माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मोरे यांनी दिली. उर्वरित जखमींवर पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रातच किरकोळ उपचार करण्यात आले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच किल्ले रायगड हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर देशमुख, शिराज सय्यद तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी शिवभक्तांच्या उपचारासाठी मदत केली. तसेच रात्रीचा अंधार लक्षात घेता शिवभक्तांसाठी जेवण, चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडवले.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात