मुंबई: राज्यातील वाढते शहरीकरण, लोकसंख्येतील सातत्याने होत असलेली वाढ तसेच शहरांचा वाढता भौगोलिक विस्तार यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाचा व्याप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये ११ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदांची आणि ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालयांची नव्याने निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
या निर्णयानुसार पुणे विभागात तीन, तर उर्वरित सर्व महसूल विभागांमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्यात येणार आहे.
प्रशासकीय गरजांचा विचार
जिल्हा व तालुका पातळीवरील वाढता प्रशासकीय भार, नागरिकांना होणारा त्रास, जिल्ह्यांचा व तालुक्यांचा भौगोलिक विस्तार, लोकसंख्येची घनता तसेच आदिवासी व दुर्गम भागातील प्रशासन सुलभ करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांची आवश्यकता व्यक्त करण्यात येत होती.
अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयांच्या निर्मितीसाठी संबंधित तालुक्यांची संख्या, लोकसंख्या, क्षेत्रफळ, आदिवासी व दुर्गम तालुक्यांची संख्या, जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर तसेच सर्वात दूरच्या गावांपर्यंतचे अंतर या बाबींचा सखोल विचार करण्यात आला आहे.
तसेच, अतिरिक्त तहसील कार्यालयांसाठी महसूल मंडळे व महसुली गावांची संख्या, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, आदिवासी व दुर्गम महसूल मंडळे, तसेच नव्या कार्यालयामुळे नागरिकांना होणारी अंतरातील बचत या निकषांचा आधार घेण्यात आला आहे.
११ अतिरिक्त जिल्हाधिकारी (प्रस्तावित ठिकाणे)
पुणे विभाग:
• पुणे जिल्हा – बारामती
• सातारा जिल्हा – फलटण
• सोलापूर जिल्हा – पंढरपूर
कोकण विभाग:
• ठाणे जिल्हा – कल्याण
• रत्नागिरी जिल्हा – दापोली
नाशिक विभाग:
• जळगाव जिल्हा – चाळीसगाव
छत्रपती संभाजीनगर विभाग:
• नांदेड जिल्हा – किनवट
अमरावती विभाग:
• अमरावती जिल्हा – अचलपूर
• यवतमाळ जिल्हा – पुसद
• बुलडाणा जिल्हा – खामगाव
नागपूर विभाग:
• नागपूर जिल्हा – कळमेश्वर
प्रस्तावित अतिरिक्त तहसील कार्यालये
तालुका – गावाचे नाव
कुर्ला – चेंबूर
बोरिवली – मालाड
अंधेरी – वांद्रे
ठाणे – नवी मुंबई
कल्याण – डोंबिवली
भिवंडी – भिवंडी (ग्रामीण)
डहाणू – कासा
वसई – विरार
पालघर – बोईसर
राजापूर – रायपाटण
खेड – चाकण
फलटण – साखरवाडी
कराड – उंब्रज
उत्तर सोलापूर – वडाळा
चंदगड – नजरे (कार्वे)
निफाड – लासलगाव
सिन्नर – सिन्नर
बागलाण – नामपूर
जळगाव – जळगाव
जामनेर – शेंदुर्णी
चाळीसगाव – चाळीसगाव
नंदूरबार – नंदूरबार
शहादा – शहादा
अक्कलकुवा – मोलगी
शिरपूर – शिरपूर (शहर)
अकोले – राजूर
नेवासा – घोडेगाव
सिल्लोड – अजिंठा
बीड – नेकनूर
आष्टी – कडा
जालना – जालना शहर व राजूर
परभणी – परभणी
जिंतूर – बोरी
लातूर – लातूर
नांदेड – नांदेड
हदगाव – तामसा
मुखेड – मुक्रमाबाद
किनवट – इस्लापूर
अमरावती – अमरावती (ग्रामीण)
अकोला – अकोला (शहर)
पुसद – शेंबाळ पिंपरी
उमरखेड – ढाणकी
सिंदखेड राजा – साखरखेडा
मेहकर – डोणगाव
खामगाव – लाखनवाडा
वाशीम – अनसिंग
रिसोड – केनवड
कारंजा – कामरगाव
नागपूर (ग्रामीण) – बुटीबोरी व हुडकेश्वर
हिंगणा – वानाडोंगरी
नागपूर – नागपूर (शहर)
कामठी – वडोदा
सावनेर – खापरखेडा
काटोल – कोंढाळी
नरखेड – जलालखेडा
मौदा – कोदामेंढी
कुही – वेलतूर
हिंगणघाट – अल्लीपूर
सेलू – सिंदी
पवनी – अड्याळ
चामोर्शी – आष्टी
कुरखेडा – मालेवाडा
आरमोरी – वैरागड
धानोरा – पेंढारी
सिरोंचा – असरअल्ली
एटापल्ली – कसनसूर
अहेरी – जिमलगट्टा

