महाराष्ट्र ताज्या बातम्या

Neelam Gorhe: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट; बाबासाहेबांच्या स्मृतीला केले वंदन

पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली.

या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. यावेळी केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे प्रतिनिधी रविंद्रचंद्रन यांनी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार केला. कार्यक्रमास लंडन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, वैभव खांडगे, स्मारक व्यवस्थापक श्री. फहद तसेच उद्योजिका अनुश्री चौगुले उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी अत्यंत कठीण परिस्थितीत—हिवाळ्यात हिटर नसतानाही कडाक्याच्या थंडीत—अभ्यास करून आपले शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र शासनाने या निवासस्थानाला शासकीय दर्जा दिला असून, येथील व्यवस्था शासनाच्या वतीने उत्तमरीत्या राखली जात आहे. तथापि, स्मारकाची देखभाल, सुशोभीकरण अधिक समृद्ध करण्यासाठी तसेच येथील कर्मचारीवर्गास आवश्यक मान्यता मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या स्मारकाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले तसेच निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचे सातत्याने लक्ष असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी London School of Economics येथे शिक्षण घेत असताना १९२१–२२ या काळात ज्या घरात वास्तव्य केले होते, ते घर आज ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊस’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये हे घर खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर केले आहे. किंग हेन्रीज रोड, कॅम्डन, लंडन येथे असलेल्या या स्मारकात बाबासाहेबांच्या जीवनातील छायाचित्रे, काही वैयक्तिक वस्तू आणि त्यांच्या कार्याचे सुस्पष्ट दर्शन घडवणारे प्रदर्शन आहे.

या भेटीमुळे बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय वारशाची ओळख अधिक ठळक झाली असून, या स्मारकाचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात