मुंबई ताज्या बातम्या

Budget Session: मुंबईतील एनटीसी मिल कामगारांच्या थकीत वेतनासाठी राज्य सरकार सक्रीय भूमिका घेणार

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत माहिती

मुंबई: राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (NTC) अंतर्गत येणाऱ्या मुंबईतील मिल कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असला, तरी राज्य शासन या प्रकरणात सक्रीय भूमिका घेणार असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य ज्योती गायकवाड यांनी एनटीसी मिल कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री फुंडकर म्हणाले की, कामगारांवर अन्याय होऊ नये आणि त्यांच्या थकीत वेतनासह सर्व देणी वेळेत मिळावीत यासाठी केंद्र व राज्य शासन समन्वयाने कार्यरत आहे. आवश्यकतेनुसार मंत्रालयात बैठक घेऊन या प्रकरणांवर निर्णय घेण्यात येईल.

केंद्र शासनाच्या कामगार विभागातील उप मुख्य आयुक्तांच्या स्तरावर राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि मिल व्यवस्थापन यांच्यात तडजोडीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सुनावण्यांच्या तारखा निश्चित झाल्या असून, त्या माध्यमातून लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे मंत्री फुंडकर यांनी नमूद केले.

या चर्चेत सदस्य संजय केळकर आणि दिलीप लांडे यांनी सहभाग घेतला.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

2 Comments

  1. zoritoler imol

    February 28, 2026

    Oh my goodness! an incredible article dude. Thanks However I am experiencing challenge with ur rss . Don’t know why Unable to subscribe to it. Is there anyone getting an identical rss downside? Anyone who is aware of kindly respond. Thnkx

  2. sfokcer topsde

    February 28, 2026

    Super-Duper site! I am loving it!! Will come back again. I am bookmarking your feeds also.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज