महाराष्ट्र ताज्या बातम्या

Budget Session: हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ९.५ ते २२ लाखांपर्यंत सहाय्य : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई: हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड तसेच बोन मॅरो प्रत्यारोपणासह एकूण नऊ प्रकारच्या गंभीर उपचारांसाठी साडेनऊ लाख ते २२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री Meghna Bordikar यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या संदर्भात सदस्य Aslam Shaikh यांनी प्रश्न उपस्थित केला होता. काही रुग्णालयांत दरपत्रक स्पष्टपणे दर्शनी भागात लावले जात नसल्याने रुग्णांची हेळसांड होते आणि वेळेवर उपचार मिळत नाहीत, असा मुद्दा त्यांनी मांडला.

राज्यमंत्री बोर्डीकर यांनी स्पष्ट केले की, आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या संयुक्त योजनेअंतर्गत उपचारांच्या दरांमध्ये रक्त तपासणी, रोगनिदान, एक्स-रे, शस्त्रक्रिया तसेच रुग्ण दाखल झाल्यापासून डिस्चार्जपर्यंतचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे. मात्र, कार्डियाक लॅब खर्चाचा समावेश नाही, असे त्यांनी सांगितले.

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ६ लाख ११ हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतल्याची माहिती देताना, मुंबईतील मोठ्या रुग्णालयांना या योजनेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यासाठी या महिन्याच्या अखेरीस बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरपत्रक जाहीर करण्याविषयी प्रश्न उपस्थित करताना भाजप सदस्य Atul Bhatkhalkar यांनी मुंबईतील रुग्णांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आणले. उपनगरांतील रुग्णालयांसाठी वेगळे दरपत्रक जाहीर करण्याचा विचार करणार का, असा सवालही त्यांनी केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

1 Comment

  1. Wayne Haffling

    February 28, 2026

    Good day! Would you mind if I share your blog with my zynga group? There’s a lot of people that I think would really appreciate your content. Please let me know. Thank you

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात