महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ मुंबईत उत्साहात संपन्न

मुंबई : राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ (National Students’ Film Festival – NSFF 2026) हा दोन दिवसीय महोत्सव २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी मुंबई विद्यापीठ, कलिना येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. राष्ट्रीय कला मंच (RKM), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि विद्यार्थी निधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात देशभरातील तरुण चित्रपट निर्मात्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविध भाषांतील आणि विविध शैलींतील चित्रपटांचे प्रदर्शन, मार्गदर्शनपर सत्रे, मास्टरक्लास आणि विचारमंथनपर चर्चांमुळे हा सिनेमा प्रवास प्रेरणादायी ठरला.

उद्घाटन सत्र सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी उद्यावर, राज कांबळे, पायल किनाके, अभिनव दीप आणि सौम्या चौरे यांच्या उपस्थितीत पार पडले.

ज्यूरी ब्रिफिंग सत्रात निधी सिंह धर्मा, अमरनाथ झा, राहुल सुहास, नीरज कुमार मिश्रा, वंदिता चक्रदेव आणि विशाल चतुर्वेदी यांनी मार्गदर्शन केले. माध्यमांची भूमिका, बदलते सिनेमा विश्व आणि जबाबदार कथनशैली यावर त्यांनी विचार मांडले.

महोत्सवासाठी एकूण ३० चित्रपटांची निवड करण्यात आली होती. हे सर्व चित्रपट दोन दिवसांत प्रदर्शित करण्यात आले आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चार मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले. अभिजीत देशपांडे यांनी पटकथा लेखनावर मार्गदर्शन केले, सुदीप लाहिरी यांनी नव्या तंत्रज्ञानावर चर्चा केली, केदार गायकवाड यांनी तांत्रिक पैलूंवर भाष्य केले, तर व्ही. एन. आदित्य यांनी सिनेमाची नैतिकता आणि भविष्यावर विचार मांडले.

विशेष पॅनेल चर्चेत “AI आणि भारतीय सिनेमाचे भविष्य” या विषयावर पूजा कदम आणि अविनाश त्रिपाठी यांनी चर्चा केली.

समारोप सोहळ्यात महर्षि शाह, आशिष चौहान, तरुण राठी, अंकित शुक्ला आणि सुनील पाटील उपस्थित होते.

पुरस्कार वितरणात –
सर्वोत्कृष्ट चित्रपट: पानपंख
विशेष प्रशंसा: सोंगटीसीझ
सर्वोत्कृष्ट संगीत: सांझा कुआं
सर्वोत्कृष्ट संपादन: रिहा
सर्वोत्कृष्ट युवा दिग्दर्शक: बाप रे बाप
आशादायी आवाज: द क्व्यू

समारोप “वंदे मातरम्” गीताने करण्यात आला.

Rajkaran Bureau

About Author

1 Comment

  1. zoritoler imol

    March 2, 2026

    The following time I read a weblog, I hope that it doesnt disappoint me as much as this one. I mean, I do know it was my option to learn, however I actually thought youd have one thing fascinating to say. All I hear is a bunch of whining about one thing that you possibly can repair for those who werent too busy in search of attention.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात