महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिलांच्या तक्रारींसाठी महाराष्ट्र महिला आयोगाचे ‘ग्रिव्हन्स पोर्टल’; मंत्री अदिती तटकरे यांची विधानसभेत माहिती

Maharashtra Women and Child Development Minister Aditi Tatkare replying in Assembly on Women Commission grievance portal

मुंबई – सोमवार : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता पीडित महिलांना त्यांच्या तक्रारींच्या स्थितीची माहिती तात्काळ मिळावी यासाठी आयोगामार्फत संगणकीकृत ‘ग्रिव्हन्स पोर्टल’ (Grievance Portal) सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ही प्रणाली महा आयटीच्या सहकार्याने विकसित केली जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. २०२१-२२ पासूनचे वार्षिक अहवाल संकेतस्थळावर उपलब्ध नाहीत का, तसेच आयोगाच्या अनुदानात दरवर्षी कपात होत आहे का, असे प्रश्न त्यांनी विचारले.

यावर उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात एकूण ३५ पदे मंजूर असून सध्या एकही पद रिक्त नाही. तसेच आयोगाचे २०२३-२४ पर्यंतचे वार्षिक अहवाल पटलावर ठेवण्यात आले असून संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.

महिला आयोगासाठी २०२३-२४ या वर्षात १५०८.९९ लाख रुपये, २०२४-२५ साठी १५५८.२९ लाख रुपये आणि २०२५-२६ साठी १८०९.६८ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हुंडाबळी, कौटुंबिक वाद आणि महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारी सामाजिक समस्या म्हणून नोंदविल्या जातात. तसेच महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम, जिल्हास्तरीय सुनावण्या, ‘आरोग्यवारी’ उपक्रम तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ याबाबत राज्यभर कार्यशाळा आयोजित करण्यात येतात, असेही त्यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात