महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड चवदार तळे क्रांतीच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ; मुंबईत कार्यक्रम

mahad-chavdar-tale-satyagraha-centenary-event-mumbai.jpg

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाला पुढील वर्षी २० मार्च २०२७ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या महाड क्रांती शताब्दी वर्षाच्या प्रारंभाचा कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघ आणि समान संधी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार असून त्याचे अध्यक्षस्थान जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) दिल्लीचे अधिष्ठाता डॉ. विवेक कुमार भूषविणार आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण हे स्वागताध्यक्ष असतील.

कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते किरण माने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच दैनिक ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विवेक गिरधारी आणि मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.

या प्रसंगी समान संधी अभियानचे अध्यक्ष सुनील कदम महाड चवदार तळे क्रांती शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यव्यापी कार्यक्रमांची माहिती देणार आहेत.

महाडच्या चवदार तळ्यावर १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची तुलना जगातील लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या फ्रेंच राज्यक्रांतीशी केली जाते. त्यामुळे या शताब्दी महोत्सवाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त मानवी अधिकार, सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांचा जागर राज्यभर करण्यात येणार आहे. तसेच उपेक्षित आणि वंचित समाजघटकांच्या उत्कर्षासाठी राज्यव्यापी कृती कार्यक्रम राबविण्याचा मानस असल्याची माहिती समान संधी अभियानचे अध्यक्ष सुनील कदम यांनी पत्रकाद्वारे दिली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात