महाराष्ट्र ताज्या बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात महिलांचा सन्मान सोहळा; सत्यश्री सोशल फाउंडेशनचा मेळावा उत्साहात

Women felicitation ceremony organised by Satya Shri Social Foundation in Pune on International Women’s Day

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यातील सत्यश्री सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांचा गौरव सोहळा आणि मार्गदर्शन मेळावा उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करत महिलांच्या स्वावलंबन आणि सक्षमीकरणाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

दरे येथील सुहासिनी मंगल कार्यालयात आयोजित या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली. महिला उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेत आपली कौशल्ये सादर केली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के-सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी महिलांना मार्गदर्शन करत शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाच्या माध्यमातून महिलांनी सक्षम होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यश्री सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा रावेतकर यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच टाकाऊ वस्तूंमधून पर्यावरणपूरक आणि टिकाऊ वस्तू तयार करणाऱ्या महिलांच्या हस्तकलेचे प्रदर्शनही या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमात महिलांसाठी खेळ, गाणी आणि गप्पा-गोष्टी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या मेळाव्याचा उपस्थित महिलांनी मनमुराद आनंद घेतला.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील महिला मान्यवर, सन्मानार्थी तसेच परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात