ताज्या बातम्या महाराष्ट्र

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासोबत इरशाळवाडीतील मुलामुलींनी लुटला मनमुराद खरेदीचा आनंद

Twitter : @therajkaran

पुणे

दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, दागिने, पर्स, मिठाई असे चित्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते. सर्वसामान्य घरातील मुलांना त्यांचे आई-वडील बाजारात नेऊन ही खरेदी करून देतात. पण, ज्यांच्या वाट्याला हे भाग्य नाही, अशा इरशाळवाडीतील अनाथ मुलामुलींनी धनत्रयोदशी या दिवाळीच्या सणानिमित्ताने तुळशीबागेत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe celebrated Diwali with children from landslide affected Irshalwadi) यांच्यासोबत मनमुराद खरेदी करत दिवाळी साजरी केली.

राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदेमातरम संघटना, दशरथ भानगिरे ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्ट, तुळशीबाग गणपती मंडळ यांच्या माध्यमातून आणि जय गणेश व्यासपीठ यांच्यातर्फे दिवाळी निमित्त दरडग्रस्त इरशाळवाडीतील (landslide affected Irshalwadi) मुलामुलींसाठी ‘पुण्याची दिवाळी सहल आणि आनंद मेळा’ या उपक्रमाचे आयोजन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, वैभव वाघ, अश्विनी शिंदे, विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित यांसह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार निरशाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी तात्काळ उपयोजना अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. अशा परिस्थितीतही त्यातील मुला-मुली पुन्हा शाळेत जाळायला लागले आहेत. त्यांनी शिकून मोठं व्हावं, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं करियर घडवावं, त्यासाठी आवश्यक ती मदत शासनाच्या माध्यमातून केली जाईल.

तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि मंडळाने अत्यंत प्रामाणिकपणे या सर्व मुलांचे आदरातिथ्य केले आहे. दिवाळीनिमित्त खरेदीचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. असेच आपण सर्व या मुलांच्या घरातील सदस्य असल्यासारखे कायम त्यांच्या सोबत राहुयात.

इरशाळवाडीतील जवळपास ४५ मुले-मुली यावेळी उपस्थित होते.

पुणे पोलिसांचे केले अभिनंदन

तुळशीबाग येथे अनेक देव देवतांची वास्तव्य आहे. मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे. अशा परिसराचे संदीप गिल हे डीसीपी आहेत, हे त्यांचे भाग्य आहे. गणेशोत्सव काळात देखील त्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा झाला. दहशतवाद्यांचे गैरकृत्य रोखण्याचे काम पुणे शहर पोलिसांनी केले आहे. त्याची एनआयए (NIA) ने दखल घेत पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे. याबाबत पुणे शहराचे आयुक्त त्यांचे सर्व अधिकारी, कॉन्स्टेबल यांचे डॉ. गोऱ्हे यांनी अभिनंदन केले

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात