मुंबई

एफडीएकडून पान शॉपवर धडक कारवाई

Twitter : @therajkaran

मुंबई :
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील अन्न व औषध विभागाकडून धडक कारवाई सुरु आहे. यातून मोठ्या प्रमाणात सुंगंधित तंबाखुजन्य जप्त करण्यात आले असून त्या त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एफडीएचे संयुक्त आयुक्त एस. पी. आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तसेच कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दोन दिवसात मुंबईतील एकूण ४ ठिकाणी पान सुंगंधित तंबाखजन्य पदार्थांवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, यातील पहिल्या कारवाईत मुंबईतील झोन ६ मध्ये मंगळवारी कार्यवाही करण्यात आली. यात जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा सुपारी स्टोअर येथे पान मसाला आणि सुंगंधित तंबाखू यांचे तीन नमुने घेण्यात आले. तसेच मो. अली इर्शाद अहमद शेख यांना ताब्यात घेण्यात आले. येथे जप्त करण्यात आलेल्या पदार्थांची किंमत ८१ हजार ७८ रुपये एवढी होती. प्रतिबंधित केलेले तंबाखुजन्य पदार्थ ठेवण्याचे कारण देण्यात आले. ते दुकान सिल्ड केले असून एका व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त ए. एन. रंजने यांनी ही कारवाई केली.

मुंबईच्या झोन ९ परिक्षेत्रात सहा पान शॉप दुकानांवर कारवाई करण्यात आली. यातून २८ नमुने घेण्यात आले असून येथे जप्त केलेल्या तंबाखुजन्य पदार्थांची किमत ८ हजार ४ रुपये इतकी आहे. ही दुकाने देखील सील्ड करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी ए. व्ही. कांडेलकर यांनी ही कारवाई केली असून सहा व्यक्तींविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असिस्टंट कमिशनर जी. पी. लिंबुरकर यांनी ही मोहिम राबवली होती. तसेच मुंबईतील झोन ४ परिक्षेत्रातही एफडीए अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली.

दादर पश्चिमेकडील तसेच परळ एसटी जवळील पान शॉप दुकानांवर कारवाई करुन २० नमुने ताब्यात घेण्यात आली. येथे जप्त केलेल्या मालाची किमत ९ हजार १४२ रुपये इतकी असून येथील दोन दुकाने सील्ड करण्यात आली आहेत. या दोन्ही प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असिस्टंट कमशिनर ए. बी. पाटील यांनी ही कारवाई केली. तर झोन १२ परिक्षेत्रात बोरिवली पश्चिमेकडील पान शॉपवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून १२ सुंगंधित तंबाखुचे नमुने घेण्यात आले. तसेच ९ हजार १९६ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. असिस्टंट कमिशनर यांनी रंजने यांनी ही कारवाई केली.  

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव