ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : कार्यरत शिक्षक मंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीवर तर मुलांना शिकविण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक

Twitter : @milindmane70

मुंबई

रायगडमधील एका शिक्षकाचा वैयक्तिक कार्यालयीन कामांसाठी गैरवापर केल्याचा धक्कादायक खुलासा शिक्षणमंत्र्यांच्या बाबतीत करण्यात आला आहे. अलिबागमधील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी मंत्री शिक्षकांच्या सेवांचा गैर-शैक्षणिक कारणांसाठी वापर करत असल्याबाबत माहिती अधिकारामध्ये कागदपत्रे प्राप्त केली आहेत. एकीकडे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागेवर सेवा निवृत्त झालेल्या 169 शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी शाळेवरील नियमीत शिक्षकाची प्रतिनियुक्ती चक्क शिक्षणमंत्री यांच्या मागणीवरून त्यांच्या कार्यालयात झाल्याने शैक्षणीक क्षेत्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दि. 27/09/2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांना पत्र देवून डॉ. महेंद्र गुणाजी शिर्के, शिक्षक प्राथमिक शाळा, कांबळे/बिरवाडी, ता. महाड यांची सेवा उसनवारी/प्रतिनियुक्तीवर शिक्षणमंत्री यांच्या कार्यालयात वर्ग करण्यास फर्माविले. त्यानंतर मंत्रालयाच्या ग्रामविकास विभागानेही 30/11/2022 रोजी अशाच प्रकारचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांना केले. मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी त्यानुसार दि. 09/12/2022 रोजी प्रतिनियुक्ती आदेश पारित करून शिक्षक डॉ. महेंद्र गुणाजी शिर्के यांची प्रतिनियुक्ती शिक्षणमंत्री यांच्या कार्यालयात करून त्यांना कार्यमुक्त केले आहे, अशी माहिती सावंत यांना माहिती अधिकारामध्ये मिळाली आहे.

या घटनेमुळे शैक्षणिक समुदायामध्ये संतापाची लाट पसरली आहे, अनेकांनी सार्वजनिक संसाधनांच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. ही घटना उत्तरदायित्व आणि सार्वजनिक संसाधनांच्या बेजबाबदार वापराची आठवण करून देणारी आहे, अशी टिका सावंत यांनी केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे किती कर्मचारी अशा प्रकारे मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत, त्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांनी एकत्रीत करावी व या कर्मचा-यांना मुळ ठिकाणी परत बोलविण्यात यावे अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

याबाबत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षण खात्यावरील चर्चेदरम्यान हा मुद्दा नागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चेचा ठरणार असल्याने शालेय शिक्षण मंत्र्याची यामुळे डोकेदुखी वाढणार असून याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याबाबत योग्य तो निर्णय घेणार का असा प्रश्न रायगड जिल्हा परिषदे मधल्या अनेक शिक्षकांना पडला आहे

शासनाच्या आदेशा प्रमाणे सदरचे प्रतिनियुक्ती आदेश काढले असून प्राथमिक शिक्षक डॉ. महेंद्र गुणाजी शिर्के हे मंत्री शालेय शिक्षण यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत .”- पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी प्राथमिक, राजिप.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात