पाकिस्तान डायरी

हाफिज सईदच्या निमित्ताने 

pakistani diary

Pakistan Dairy

X: @therajkaran

दहशतवादी हाफिज सईद याच्यावरून पाकिस्तानमधील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल अशी शक्यता आहे. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2018 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हाफिज सईद (Mastermind of Mumbai terror attack) सूत्रधार होता. त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी भारताने गुरुवारी केली. अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानात (Pakistan) त्याचे पडसाद उमटले. भारत आणि पाकिस्तानमध्ये गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणासंदर्भात द्विपक्षीय करार झालेला नाही. त्यामुळे हाफिज सईद किंवा अन्य कोणालाही भारताच्या ताब्यात देणे शक्य नाही असा खुलासा पाकिस्तानाच्या परराष्ट्र खात्याने केला आहे.

हाफिज सईद (Terrorist Hafiz Saeed) सध्या पाकिस्तानमधील तुरुंगात आहे. त्याला दोन गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे पाच आणि 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. मुंबईवरील हल्ल्यानंतर हाफिज सईद मोकाटच होता. लाहोरमध्ये (Lahore) राहून भारताविरुद्ध गरळ ओकणारी भाषणे देत होता. अमेरिकेने (USA) हाफिज सईदवर दहा लाख डॉलरचे इनाम घोषित केले होते. तरीसुद्धा त्याला हात लावायची हिंमत पाकिस्तान सरकारने दाखवली नव्हती. हाफिज सईदला पहिल्यांदा 2016 मध्ये अटक झाली. त्यावेळी पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. पाकिस्तानच्या व्यापारावर बंधने घालण्यात आली होती. आर्थिक नुकसान होऊ नये यासाठीच पाकिस्तानने हाफिज सईदला अटक केली. कालांतराने न्यायालयाने त्याला शिक्षाही ठोठावली. आर्थिक मुस्कटदाबी झाली नसती तर पाकिस्तानने हे पाऊल उचलले नसते.

दहशतवाद्यांना पाठबळ आणि संरक्षण देण्याची ही पाकिस्तानची पहिली वेळ नव्हे. 1980 च्या दशकात पाकिस्तानच्या रस्त्यांवर हातात बंदुका घेतलेले, जिहादच्या घोषणा देणारे दहशतवादी मनमोकळेपणाने फिरताना दिसत असत. काश्मीरमध्ये 1989 मध्ये स्थानिक ब्राह्मणांवर अत्याचार (atrocities against Kashmiri Pundits) करून त्यांना तेथून हुसकावून लावल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांना बळ मिळाले होते. जवळपास त्याच सुमारास रशियन सैन्याने अफगाणिस्तानमधून माघार (withdrawal of Soviet troops from Afghanistan) घेतल्यानंतर अफगाणी दहशतवादी आणि पाकिस्तानी दहशतवादी यांच्यात एक प्रकारे आघाडी झाली होती. ही आघाडी प्रदीर्घकाळ टिकली. या कालावधीत पाकिस्तान हा दहशतवादी कारवायांचे जागतिक केंद्र बनला.

अफगाणिस्तानमध्ये 2022 मध्ये तालिबानने (Taliban) सत्ता हस्तगत केली तेव्हा सर्वाधिक आनंद पाकिस्तानी दहशतवाद्यांना झाला होता. मात्र, हा आनंद अल्पजीवी ठरला. तालिबानकडून पाकिस्तानला मदत तर झाली नाहीच. उलट पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या समर्थकांचा ज्याप्रकारे खात्मा होत आहे ते बघता यामागे अफगाणिस्तानातील तालिबान असावे अशी शंका पाकिस्तानातील जाणकार व्यक्त करू लागले आहेत. स्वतःच उभा केलेला दहशतवादाचा भस्मासूर आता पाकिस्तानवरच उलटू पाहत आहे. हाफिज सईद हे एक निमित्त आहे. पाकिस्तानी दहशतवादाचा चेहरा जगापुढे उघड करण्याची ही भारताची आणखी एक खेळी आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुका (General election in Pakistan) फेब्रुवारी 2024 मध्ये संपतील. त्यानंतर या खेळीचा पुढील टप्पा सुरू होईल.

Also Read: पुन्हा एकदा बांगलादेश… 

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

ताज्या बातम्या पाकिस्तान डायरी

इम्रान खान, गोपनीय कागद आणि शह – काटशह

X: @therajkaran इम्रान खान पाकिस्तानचे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. नव्या चेंडूबरोबरच ते
पाकिस्तान डायरी

ते परत आले आहेत

X: @therajkaran नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी त्यांना मिळाली आणि तिन्ही