मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा नवा भव्य आराखडा तयार करण्यात आला असून, या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांच्या भव्य पुतळ्याची उभारणी कधी होणार, यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. याचबरोबर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे ‘जगन्नाथ शंकर शेठ’ असे नामकरण कधी होणार, याबाबतही त्यांनी विचारणा केली.
उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अंतिम निर्णय अद्याप बाकी असून, केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.