By योगेश त्रिवेदी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना मागाठाणे शाखा क्रमांक १२ तर्फे युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विभागातील सर्व ३१ अंगणवाड्यांमधील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक अंगणवाड्यांना सतरंजी देण्यात आल्या. या उपक्रमांमुळे स्थानिक स्तरावर सामाजिक बांधिलकी जपल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमात विभागप्रमुख श्री. उदेश पाटेकर, महिला विभाग संघटक सौ. शुभदा शिंदे, विधानसभाप्रमुख अशोक म्हामूनकर, रेखा बोऱ्हाडे, माजी नगरसेविका सौ. सिमिंतीनी नारकर, विधानसभा संघटक मिलिंद साटम, सौ. रोहिणी चौगुले, उपविधानसमन्वयक सौ. सारिका झोरे, सौ. वैभवी तावडे, विधानसभा समन्वयक सौ. सुप्रिया बोवलेकर, शाखाप्रमुख सचिन मोरे, शाखा समन्वयक सौ. इतिश्री महाडिक तसेच शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन मागाठाणे विधानसभा निरीक्षक श्री. शशिकांत झोरे आणि युवा विभाग अधिकारी वृषल पुसाळकर यांनी केले.