मुंबई: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या फेक एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयीन चौकशीत पाच पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, शिंदेच्या हाताळलेल्या बंदुकीवर त्याचे बोटांचे ठसेच नव्हते, असेही उघड झाले आहे.
या प्रकरणात भाजपशी संबंधित संस्थाचालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर दुसरीकडे अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काऊंटरचे श्रेय घेतले होते.
https://t.co/q0KfnQkF5D pic.twitter.com/C7FeT2CKx7
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 20, 2025
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीका करत, “फक्त मतांसाठी मांडलेला फेक नरेटिव्ह आणि बाजार आता उघडकीस येत आहे,” असे मत व्यक्त केले. त्यांनी या प्रकरणातील पोलिसांसोबतच तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवरही जबाबदारी ठेवल्याचे सांगितले.