महाराष्ट्र ताज्या बातम्या

V P Election: “संविधान रक्षणाचा संकल्प, सर्व पक्षांकडे पाठिंब्याची विनंती करणार” – उपराष्ट्रपती पदाचे INDIA आघाडी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी

मुंबई: उपराष्ट्रपती पदाचे INDIA आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज टिळक भवन येथे काँग्रेस खासदारांची भेट घेतली. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “देश संकटात आहे, मला संधी मिळाली तर संविधानाचे संरक्षण करेन. पाठिंब्यासाठी सर्व पक्षांच्या खासदारांना पत्र लिहिणार असून भाजप खासदारांनाही भेटेन. उपराष्ट्रपती निवडणुकीत व्हीप नसल्याने गुप्त मतदानातून पाठिंबा मिळू शकतो.” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Uddhav Thackeray on Maratha Reservation: “मराठी माणूस न्यायासाठी मुंबईतच येणार… तो काय सुरत-गुवाहाटीला जाणार?” – उद्धव ठाकरे यांचे फडणवीस-शिंदेंवर शरसंधान

मुंबई: मुंबईत उसळलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी आक्रमक शैलीत शरसंधान केले. “मराठी माणसाला न्याय हवा असेल, तर तो मुंबईतच येणार. न्यायासाठी तो सुरतला किंवा गुवाहाटीला जाणार नाही. कारण मुंबई ही मराठी माणसांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Fadnavis on Jarange Patil : “तुम्ही ओबीसीतूनच आरक्षण का मागत आहात?” – मुख्यमंत्री फडणवीस यांचा जरांगेंना सवाल!

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. किल्ले शिवनेरीवरून निघालेला मनोज जरांगे यांचा मोर्चा सध्या मुंबईच्या दिशेने कूच करत असून, “आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही” या निर्धारामुळे सरकार आणि प्रशासनाच्या तंबूत खळबळ उडाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक सूर लावत जरांगे यांच्या मागण्यांवर थेट सवाल उभा केला. त्यांनी विचारले – “मराठा समाजाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil: आता शिंदे समितीचाच अहवाल ठरणार गेमचेंजर!

मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील ठाम असून त्यांनी आंदोलनाची दिशा आता थेट मुंबईकडे वळवली आहे. यासोबतच हैद्राबाद, मुंबई आणि सातारा येथील गॅझेट लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या गॅझेटमध्ये मराठा समाजाची नोंद कुणबी म्हणून असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, जरांगे पाटलांची ही मागणी अमलात आणता येणार नाही असे सरकारने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आझाद मैदानात जरांगेंच्या मोर्चाला सरकारच्या कठोर अटींचा फास!

मुंबई: मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवं उग्र वळण मिळालं असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आता थेट आझाद मैदानातून सरकारला धडक देण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या मोर्चासाठी दिलेल्या परवानगीत सरकारने घातलेल्या कठोर अटींमुळे आंदोलनावर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारकडून लादलेल्या अटींत न्यायालयीन परवानगी फक्त एका दिवसापुरतीच; त्यात शनिवार–रविवार व सुट्टीच्या दिवशी बंदी; […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

UIDAI कडून देशभरातील शाळांना आवाहन – ५ ते १५ वयोगटातील मुलांचे आधार बायोमेट्रिक अपडेट (MBU) वेळेत पूर्ण करा

नवी दिल्ली: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने देशभरातील शाळांना ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांचे आधार अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. भुवनेश कुमार यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून, शाळांमध्ये विशेष MBU शिबिरे आयोजित करण्याची विनंती केली आहे. या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सुवर्णपदक विजेते दिव्यांग जलतरणपटू संतोषकुमार यादव यांचा सत्कार

मुंबई: ‘खेलोत्सव पॅरा एडिशन – पॅरा स्विमिंग २०२५’ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक विधी अधिकारी संतोषकुमार यादव यांचा आज (२६ ऑगस्ट) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या हस्ते पालिका मुख्यालयात सत्कार करण्यात आला. दोन्ही हात नसतानाही जलतरणात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. जोशी यांनी त्यांचे कौतुक केले आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

१२ पुलांवरून गणेश मिरवणूक नेताना घ्यावी काळजी – पालिकेचे आवाहन

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक स्वरुपाचे असून काहींची दुरुस्ती सुरू आहे तर काहींची कामे पावसाळ्यानंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे श्रीगणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. महानगरपालिका व मुंबई पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकार उलथविण्याची भाषा चीड आणणारी – महसूल मंत्री बावनकुळे

मुंबई : “महायुती सरकार तीन कोटी 17 लाख मते आणि 51.78 टक्के मताधिक्याने निवडून आले आहे. अशा मजबूत सरकारला उलथवण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही, ती चीड आणणारी आहे”, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना ठणकावले. बावनकुळे म्हणाले, “आंदोलन व मागण्या मांडण्याचा सर्वांना हक्क आहे. पण […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता थेट लंडनमध्ये उभारले जाणार ‘महाराष्ट्र भवन’ – उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा; ५ कोटींचा निधी मंजूर

मुंबई: लंडनमधील मराठी बांधवांचा अभिमान उंचावणारी आणि दीर्घकाळची स्वप्नपूर्ती ठरणारी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मंगळवारी केली. लंडनमधील ‘चर्च ऑफ इंग्लंड’ची ऐतिहासिक वास्तू खरेदी करून तेथे ‘महाराष्ट्र भवन’ (Maharashtra Bhavan in London) उभारले जाणार असून त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधीही त्यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे लंडनमधील मराठी बांधवांना […]