महाराष्ट्र ताज्या बातम्या

Fraud: 80 लाखांची फसवणूक – पणदरे येथील टोळीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल!

पुणे : सॉफ्टहार्ट ऑटोमेशन प्रा. लि. या कंपनीची तब्बल 80 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रमुख आरोपी हे मूळचे बारामती तालुक्यातील पणदरे गावचे असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. फसवणुकीचा प्रकार 2018 ते 2022 या काळात घडला असून, 2024 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल दोषारोपपत्रात उल्लेख केलेले आरोपी पुढीलप्रमाणे: […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis: ही शेवटची संधी; यापुढे एकही चूक खपवून घेतली जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंत्र्यांना खणखणीत इशारा

मुंबई : सत्तेतील मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापल्याचे पडसाद बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. या बैठकीनंतर त्यांनी तब्बल २० मिनिटे मंत्र्यांची शाळा घेतली. मंत्र्यांच्या अशा वर्तनामुळे सरकारची विश्वासार्हता आणि जनतेतील प्रतिमा यावरून माध्यमांत सरकारबद्दल निर्माण होणारी नकारात्मक चर्चा यामुळे अगोदरच मुख्यमंत्री प्रचंड नाराज झाले होते. अशा वेळी मंत्रिमंडळ बैठकीचा पर्फेक्ट टायमिंग साधत मुख्यमंत्री […]

शोध बातमी विश्लेषण

Shalarth ID Scam: असा होतोय शालार्थ आयडी अर्थात बॅक डेटेड शिक्षक भरती मान्यतेचा कोट्यावधींचा घोटाळा

X @vivekbhavsar महाराष्ट्रात गेले काही दिवस “शालार्थ आयडी” हा घोटाळ्याचा परवलीचा शब्द झाला आहे. नुकत्याच संपलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले आणि काही शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली गेली. “शालार्थ आयडी” घोटाळा हा केवळ एखाद्या जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नसून राज्यभर या कोट्यावधींच्या घोटाळ्याची व्याप्ती पसरलेली आहे. एका अंदाजानुसार शालार्थ आयडीची राज्यातील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Piyush Goyal: भारत–यूके व्यापार करारामुळे भारतीय उद्योगांसाठी नव्या संधी; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मुंबईत सत्कार

मुंबई :भारत–यूके मुक्त व्यापार करारामुळे (FTA) भारतीय निर्यातदार आणि लघुउद्योगांसाठी नवे क्षितिज खुले झाले असून, या ऐतिहासिक करारानंतर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. बोरीवली येथे आयोजित या कार्यक्रमात “यूके बाजारातील निर्यात संधी” या विषयावर विशेष सत्र घेण्यात आले, ज्यात विविध उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले. कार्यक्रमात बोलताना मंत्री गोयल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

AAP: पक्ष बदलू नीती, सोयीने टीका आणि पुणे ड्रग्जच्या विळख्यात – हे महाराष्ट्राचे वास्तव – आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचा हल्लाबोल

पुणे :पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत आहेत. या पार्श्वभूमीवर आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर एकत्रित टीका केली आहे. “प्रथम गिरीश चौधरी यांचा जमीन घोटाळा – तेव्हा भाजप गप्प; आता खेवलकर प्रकरण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dhananjay Munde: जात म्हणून आमचा द्वेष केला, पण आम्ही कुणाचाही द्वेष करणार नाही” – धनंजय मुंडे यांचे ठाण्यातून जोरदार प्रत्युत्तर

ठाणे –“मी, माझा समाज, माझं कुटुंब, माझा जिल्हा यांच्यावर सातत्याने वैयक्तिक आरोप झाले. २०० दिवस माझी मीडिया ट्रायल चालली. मात्र आम्ही द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही,” अशा ठाम शब्दांत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. सकल वंजारी समाज अधिवेशन ठाण्यात पार पडले. यावेळी मुंडेंनी अनेक महिन्यांनंतर आपला संयम दाखवत जोरदार भाषण केले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

OBC: ओबीसी हितासाठी रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीसाठी तीव्र लढा उभारणार – प्रांताध्यक्ष कल्याण दळे यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीची एक दिवसीय बैठक शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील हडकोमधील संत सेना भवन येथे पार पडली. यावेळी प्रांताध्यक्ष कल्याणराव दळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रोहिणी आयोगाच्या अंमलबजावणीसाठी तीव्र लढा उभारण्यात येणार असून त्यासाठी अभ्यासपूर्ण मांडणी आणि आक्रमक संघटन बांधणी आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून संघटनेत ६० टक्के […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Smiles: ‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य मुंबई : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेले टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविणे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे. यासाठी त्यांनी विदर्भातील अशा बालकांवर उपचार आणि जनजागृतीची गरज ओळखत त्यांनी स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Solar Energy: सौर ऊर्जेचा वस्त्रोद्योगात वाढता वापर; सहकारी सूतगिरण्यांसाठी धोरणात्मक निर्णय — मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सहकारी सूतगिरण्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तसेच वस्त्रोद्योगाच्या व्यापक विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले की सामाजिक न्याय, आदिवासी विकास व इतर मागास बहुजन कल्याण विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या नव्या सूतगिरण्यांसाठी एकसमान अर्थसहाय्य निकष तयार करावेत आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Kargil: कारगिल युद्धाचा थरार आता लाईव्ह अनुभवता येणार!

द्रास युद्धस्मारकातील ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार मुंबई –कारगिल युद्धातील भारतीय जवानांचा शौर्यगाथा आणि त्याग आता पर्यटकांना थेट अनुभवता येणार आहे. द्रास युद्धस्मारक येथे लवकरच भव्य ‘लाईट अँड साऊंड शो’ सादर होणार असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेत ३ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. जून महिन्यात […]