मुंबई : मुंबई महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डा घेतल्यास प्रत्येकी ₹१५,००० दंड आकारण्याचा घेतलेला निर्णय हा अन्यायकारक, गणेशभक्तांच्या श्रद्धेवर आघात करणारा, आणि धार्मिक स्वातंत्र्यावरील घाला असल्याचा तीव्र निषेध राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरद पवार गटाच्या मुंबई विभागाने केला आहे.
गेल्या वर्षी ₹२,००० असलेला दंड थेट सातपट वाढवून ₹१५,००० करणे म्हणजे मंडळांवर आर्थिक दडपशाही असून, या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनात मोठा अडथळा निर्माण होणार आहे.
मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
ठळक मुद्दे: मुंबईतील रस्ते आधीच खड्ड्यांनी पोखरलेले – त्यावर पालिका दोषी असतानाही जबाबदारी नाही, सार्वजनिक गणेशोत्सव हा धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उत्सव – त्यावर दंड लादणे अशोभनीय, नुकताच पवईमध्ये खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू – जबाबदार कोण?
बांगर यांनी या प्रकरणी पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करून न्याय्य आणि सहकार्यपूर्ण तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
शहरातील पायाभूत अडचणींवरही ठोस मागण्या: उड्डाणपूलांवरील खड्ड्यांची तत्काळ, गुणवत्तापूर्ण दुरुस्ती, दोषी कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई, तुंबलेले नाले व प्रवाह मार्गांची तातडीने सफाई, तृतीय पक्ष परीक्षणासह देखभाल समितीची स्थापना
“जर हा दंडाचा निर्णय त्वरित मागे घेतला नाही, तर सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिला.
उपस्थित शिष्टमंडळाचे प्रमुख सदस्य: ॲड. अमोल मातेले, मुंबई अध्यक्ष, ओमकार शिर्के, अमोल हिरे – मुंबई उपाध्यक्ष, इम्रान तडवी, सत्यनारायण यादव, रोहित सावंत – मुंबई सरचिटणीस, हनीफ पटेल, वैभव पांचाळ – मुंबई सचिव, कैलास कुशेर – ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष, सचिन लोंढे – उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष, संजय कोळी, कमलेश दांडगे, स्वप्नील पाटील, सुयोग भुजबळ – तालुका अध्यक्ष, आबीद शेख (वॉर्ड 209), कुणाल इनकर (वॉर्ड 122), राजेंद्र ढवळे (वॉर्ड 157)
“मुंबईतील गणेशभक्तांच्या श्रद्धेला दडपणात टाकणाऱ्या कोणत्याही धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. प्रशासनाने जनभावना लक्षात घेऊन तातडीने हा निर्णय मागे घ्यावा,” अशी ठाम मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरद पवार गट, मुंबई विभाग यांनी केली आहे.