मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निवडणुक प्रसिद्धीसाठी कोट्यवधींचा खर्च : सतेज पाटलांचा निशाणा

X: @therajkaran

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच रिंगणात उतरले आहेत. मतदारवर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दररोज अनेक जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च होत असून, याच खर्चाचा हिशोब मांडून काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांकडून दररोज वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, डिजिटल होर्डिंग, सोशल मीडियावर होत असलेल्या खर्चाची आकडेवारी दिली आहे.

त्यानुसार, “महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने एका महिन्याच्या प्रसिद्धीसाठी ‘विशेष माध्यम आराखडा’ मंजूर केला आहे. यामध्ये 30 दिवसांसाठी तब्बल 84 कोटी रुपये म्हणजेच दिवसाला 2 कोटी 80 लाख रुपये माध्यमांतील प्रसिद्धीवर उधळले जाणार आहेत”, अशी पोस्ट केली आहे.

याशिवाय, या खर्चाची आकडेवारी पुढीलप्रमाणे विभागलेली आहे: वर्तमानपत्रे – 20 कोटी रुपये, वृत्तवाहिन्या – 20 कोटी 80 लाख रुपये, डिजिटल होर्डिंग-एलईडी – 37 कोटी 55 लाख रुपये, सोशल मीडिया – 5 कोटी रुपये”, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

आगामी निवडणुकीत प्रसिद्धीसाठी सरकार वाटेल तेवढा खर्च करण्यास तयार आहे. मात्र दुसरीकडे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही. आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जात आहेत. पण सरकार मात्र प्रसिद्धीला हपापले आहे”, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Also Read: ओवेसी यांच्या सांगण्यावरूनजीवे मारण्याची धमकी; खासदार नवनीत राणा यांचा आरोप

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव