मुंबई – जनसुरक्षा विधेयकाबाबत जनतेत संभ्रम आहे, तो दूर करूनच नव्याने विधेयक आणावे, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य आ. अभिजित वंजारी यांनी आज केली. १२ हजारांहून अधिक व्यक्ती व संघटनांनी सुचना व आक्षेप नोंदवले असून जनसुनावणी झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.
विधान परिषदेत वंजारी म्हणाले, नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक असल्याचे सरकार म्हणते, पण शीर्षकात त्याचा उल्लेख नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी ७२% नक्षलवाद संपवल्याचे सांगितले, ते कोणत्या कायद्याने? टाडा, पोटा, युएपीए, मकोका हे कायदे आधीच अस्तित्वात असून ते पुरेसे कठोर आहेत.
नव्या विधेयकात दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्याची तरतूद असून संस्थेचे सदस्य, देणगीदार यांच्यावर कारवाईची मुभा दिली आहे. सरकारकडून विरोधाचा आवाज दाबण्यासाठीच हा कायदा आणला जात असल्याचा आरोपही वंजारी यांनी केला.