मुंबई ताज्या बातम्या

मुंबईत राम नव्हे, परशुरामांच्या नावावर वादभगवान परशुरामांच्या सन्मानासाठी ब्राह्मण समाज मैदानात

मुंबई: मुंबईत यंदा राम नव्हे, तर भगवान परशुराम यांच्या नावावर वाद निर्माण झाला आहे. मालाड पश्चिम, मालवणी येथे उभारण्यात येणाऱ्या सात एकरांच्या “वैदिक थीम पार्क”चे नाव “भगवान परशुराम वैदिक थीम पार्क” ठेवण्याचा निर्णय पूर्वी झालेला होता. मात्र, आता त्याला “लोकशाही थीम पार्क” असे नाव देण्याचा विचार सुरू आहे, ज्याला ब्राह्मण समाजाने कडाडून विरोध केला आहे.

या संदर्भात, मुंबई आचार्य ब्राह्मण समाजाने माजी खासदार गोपाल शेट्टी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. त्यांनी उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचवली. समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, भगवान परशुराम वैदिक थीम पार्क हे नाव ठेवल्यास हे कोकणाचे निर्माता असलेल्या भगवान परशुरामांना भारतीय जनता पक्ष आणि सरकारकडून आदरांजली ठरेल. त्यांनी चेतावणी दिली की, जर हा निर्णय बदलला गेला तर सर्व ब्राह्मण समाज एकत्रित आंदोलन करेल.

माजी खासदार गोपाल शेट्टी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “भगवान परशुराम पार्क”चे नाव बदलले जाणार नाही. त्यांनी यासाठी उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी याला सहमती दर्शवली आहे. मात्र, या प्रकरणावर बीएमसीची अंतिम प्रक्रिया होणे बाकी आहे.

हे पार्क सध्या मालाड पश्चिम येथे उभारले जात असून, पूर्वी या शासकीय जमिनीवर अनधिकृत फर्निचर दुकानदारांचे अतिक्रमण होते. माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळे ही जागा मोकळी होऊन या ठिकाणी पार्क उभारणी सुरू झाली आहे.

वरिष्ठ पत्रकार आणि मुंबई आचार्य ब्राह्मण समाजाचे सदस्य सुनील शर्मा यांनी केंद्रिय मंत्री पीयूष गोयल व महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे की, या पार्कचे नाव भगवान परशुराम वैदिक थीम पार्क ठेवले जावे. तसेच या पार्कमध्ये भगवान परशुरामांचे भव्य मंदिर, त्यांच्या जीवनाशी संबंधित संस्मरणे आणि कलाकृती प्रदर्शित केल्या जाव्यात. चिपळूणमधील परशुराम देवस्थानाप्रमाणेच हे पार्क विकसित करण्यात यावे, जेणेकरून परशुराम भक्त दूरदूरून दर्शनासाठी येतील.

या विषयावर निवेदन सादर करताना प्रवीण आचार्य, धीरज नागोरे, गौतम आचार्य, अविनाश आचार्य, रविंद्र आचार्य आणि संजीवनी शर्मा यांसारखे मुंबई आचार्य ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज