मुंबई ताज्या बातम्या

दामोदर नाट्यगृह पाडले; शाळेच्या नावाखाली खाजगी बिल्डरच्या घशात जागा घालण्याचा डाव?  

X : @Rav२Sachin

मुंबई: मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा जोपासत परळच्या दामोदर नाट्यगृहाने गेल्यावर्षी शतकी वाटचाल पूर्ण केली खरी, मात्र आता नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या संदर्भात सत्य उघडकीस आल्यावर कलाकार मंडळी उपोषणाच्या तयारीत आहेत. या जागेवर शाळा  बांधून उर्वरित जागेचा एफ एस आय खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव रचला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

अलिकडेच 1 नोव्हेंबर 2023 पासून दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी बंद झाले आणि त्याचे तोडकामही सुरू झाले. मात्र यासंदर्भात कोणतीही पूर्व कल्पना देण्यात आलेली नाही, असा आरोप सहकारी मनोरंजन मंडळाच्या कमिटी सदसयांनी केला आहे. अलिकडे नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली ते जमीनदोस्त करण्याचा डाव असल्याचा आरोप करीत नाट्यसृष्टीतील कलावंत आणि निर्माता तसेच बॅकस्टेज आर्टिस्ट यांनी आंदोलन पुकारले होते. 

याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेत कोणताही अन्याय न होता दामोदर नाट्यगृहाचे रूप हे अबाधित ठेवले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आंदोलकर्त्यांना दिली होती. मात्र प्रत्यक्षात दामोदर नाट्यगृहाच्या प्रस्तावित पुनर्बांधणीमध्ये नाट्यगृहाच्या जागेवर खाजगी सीबीएसई शाळेची वास्तू उभारली जात आहे. भविष्यात नंतर दुसरीकडे छोटेसे नाट्यगृह बांधून त्याचा एफएसआय दुसरीकडे वापरला जाण्याचा संशय व्यक्त केला जात आहे, असा आरोप सहकारी मनोरंजन मंडळाचे कमिटी सदस्य रविराज नर यांनी केला आहे. 

ते म्हणाले की, 500 आसनक्षमतेच्या प्रस्तावित मिनी थिएटरमध्ये मराठी नाटक आणि लोककला प्रकार जगणार नाहीत. या पूर्वी दामोदर नाट्यगृहाच्या नुतनीकरणात 803 च्या ऐवजी 763 सीट्स नाट्यगृहात उरल्या. आताच्या पूर्णबांधणीमध्ये 763 सीट्स ऐवजी प्रस्तावित 500 सीट्स मध्ये नाट्यगृह नव्हे तर नाट्यगृहाचे स्मारक उभे राहिल, अशी भीती येथील नाट्यकर्मीनी तसेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कमिटी सदस्यांनी व्यक्त केली आहे. 

नाट्यगृहाच्या अशा चुकीच्या पुनर्बांधणी विरोधात दामोदर नाट्यगृहाचा एक भाग असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळ आणि मराठी नाट्यकलावंतांनी आंदोलन छेडलेले आहे. ‘पुनर्निर्माण करायचं झालंच तर नाट्यगृह अधिक मोठे आणि अत्याधुनिक उभारले जावे. सहकारी मनोरंजन मंडळाला पूर्वीप्रमाणेच त्या नाट्यगृहात कार्यालयाची जागा द्यावी, नाट्यगृहाशी संबंधित कर्मचाऱ्यांना तोपर्यंत इतर उपक्रमात सामावून घ्यावे’ अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. 

मात्र सोशल सर्व्हिस लीग संस्थेकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उलट आंदोलन छेडल्याचा राग मनात धरून कोणतीही पूर्वसूचना न देता सहकारी मनोरंजन मंडळाच्या कार्यालयाची वीज आणि पाणी पुरवठा गेल्या महिनाभरापासून बंद केला आहे. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. यामुळे व्यथित होऊन आता कलाकार मंडळी आता उपोषण करण्याचा तयारीत आहेत, असे नर यांनी सांगितले.

Also Read: पारा यांचे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी येणार अरुणभाई गुजराथी

Sachin Unhalekar

Sachin Unhalekar

About Author

सचिन उन्हाळेकर ( Sachin Unhalekar ) हे ज्येष्ठ पत्रकार असून 23 वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिका, शैक्षणिक - कला आणि मंत्रालय पत्रकारिता करत आहेत. त्यांनी मराठी, इंग्रजी सोबत हिंदी भाषेतील वृत्तपत्रात पत्रकारिता केलेली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज