महाराष्ट्र ताज्या बातम्या

अमानुष अत्याचाराची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

Twitter : @therajkaran

मुंबई

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात १७ वर्षीय मुलाने अडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत विकृत घटना असून बलात्कारानंतर आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत अमानवी असून माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी निवेदनात म्हटले आहे.

आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावा. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलगी व तिचे पालक यांचे समुपदेशन करण्यात यावे. पीडित अल्पवयीन मुलीला मनोधैर्य योजनेतून (Manodhairya scheme) ताबडतोब मदत देण्यात यावी. पीडितेच्या पुनर्वसनासाठी तिला सर्वोतोपरी सहकार्य करावे आणि या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधीत पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. या घटनेबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ उपसभापती कार्यालयास सादर करण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात