महाराष्ट्र ताज्या बातम्या

रोजगारक्षमतेत वाढीसाठी शिक्षण–उद्योग क्षेत्र एकत्र

मुक्त विद्यापीठाची निमा व लघुउद्योग भारतीसोबत बैठक

नाशिक — यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या यश इन सभागृहात शिक्षण–उद्योग समन्वय उपक्रमांतर्गत निमा (नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) आणि लघुउद्योग भारती यांच्यासोबत संयुक्त बैठक पार पडली. उद्योगांना आवश्यक कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.

बैठकीचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी भूषवले. व्यासपीठावर निमा अध्यक्ष आशिष नहार, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन मंडळ सदस्य प्रा. डी. एम. गुजराथी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक प्रा. सुरेंद्र पाटोळे उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले, “विद्यापीठातून उद्योगक्षेत्रात जाणारे मनुष्यबळ काहीसे अपूर्ण साचेतील असते. आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७चे ध्येय साध्य करायचे असेल, तर शिक्षण आणि उद्योग यांनी आपली शक्तिस्थाने व गरजा ओळखून काम करणे गरजेचे आहे.”

त्यांनी पुढे सुचवले, उद्योग प्रात्यक्षिकांशी जुळणारे कॅप्सूल शिक्षणक्रम, हस्तपुस्तिका आणि लिंक आधारित व्हिडिओ सामग्री, उद्योग विकासासाठी १–२ वर्षांचे अल्पमुदतीचे संशोधन प्रकल्प, हे उपक्रम राबवण्यासाठी विद्यापीठ सिद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निमा अध्यक्ष आशिष नहार म्हणाले, “नाशिकमध्ये सकारात्मकतेने काम सुरू झाले आहे. येणारा कुंभमेळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून विकासाचा मेळा ठरेल. उद्योगक्षेत्राला अनेक विशेष शिक्षणक्रम व प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे.”

त्यांनी सुचवले, शिक्षण व उद्योगातील मान्यवरांची एक संयुक्त समिती स्थापन करून कौशल्य–आधारित प्रशिक्षणाचा रोडमॅप तयार करावा. लघुउद्योग भारतीचे संचालक निखील तापडिया यांनी या उपक्रमात सक्रिय सहभागाचे आश्वासन दिले.

सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे नामकरण आवारे म्हणाले, “उपलब्ध रोजगार आणि अपेक्षित कौशल्य यातील दरी भरून काढण्यासाठी ही बैठक अत्यंत उपयुक्त आहे.”

बैठकीत शिक्षण–उद्योग सहकार्यासाठी खालील मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्योग गरजांनुसार नवीन शिक्षणक्रम विकास, ऑन-जॉब ट्रेनिंग मॉडेल, संयुक्त एमओयू, कंपन्यांसाठी तत्काळ मनुष्यबळ उपलब्धता, अभ्यासक्रम विकासासाठी सल्लागार समिती स्थापन, संयुक्त संशोधन–विकास प्रकल्प. 

बैठकीत निमा आणि लघुउद्योग भारतीचे संचालक, पदाधिकारी, तसेच विद्यापीठाचे प्राध्यापक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. सुरेंद्र पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल म्हापणकर यांनी केले.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात