महाराष्ट्र ताज्या बातम्या

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ नाटक रंगभूमीवर

२४ फेब्रुवारी रोजी माटुंग्यातील यशवंत नाट्यगृहात प्रयोग

मुंबई: बृहन्मुंबई गुजराती समाज आणि महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाची स्थापना करून मुंबईतील गुजराती समाजबांधवांना विविध व्यासपीठ उपलब्ध करून देणारे, मराठी व गुजराती साहित्यनिर्मितीत मोलाचे योगदान देणारे, तसेच गेली ६० वर्षांहून अधिक काळ ‘कच्छशक्ती’ हे नियतकालिक अखंडपणे प्रकाशित करणारे ज्येष्ठ समाजसेवक व साहित्यिक डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनावर आधारित ‘हेमूदादा’ हे नाटक रंगभूमीवर सादर होत आहे.

हे नाटक मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी माटुंगा (पश्चिम) येथील यशवंत नाट्यगृहात रात्री ८.४५ वाजता रंगमंचावर येणार आहे. वसंत मारु आणि कवल सावला लिखित व दिग्दर्शित या नाटकात डॉ. हेमराज शाह यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याचा प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे.

‘हेमूदादा’ नाटकाचे पुढील प्रयोग २५ फेब्रुवारी २०२६ रोजी घाटकोपर येथील झवेरबेन हॉलमध्ये आणि २२ मार्च २०२६ रोजी न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातुश्री सभागृहात, रात्री ८.४५ वाजता सादर करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २२ मार्च रोजी डॉ. हेमराज शाह वयाची ८५ वर्षे पूर्ण करून ८६व्या वर्षात पदार्पण करीत आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

डॉ. हेमराज शाह यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘हेमूदादा’ या नाटकासोबतच ‘डॉ. हेमराज शाह : एक समर्पित जीवन’ या शीर्षकाची डॉक्युमेंटरी फिल्मही तयार करण्यात आली असून, ती आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजली आहे. याच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर आधारित ‘कलश छलके’ ही कादंबरीही प्रकाशित झाली आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात