X: @therajkaran
नागपूर: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त (Centenary year of Maharashtra Legislative Council) महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांच्या संकल्पनेनुसार विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य आणि नागपूर मधील ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनानिमित्त उद्या दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता विधानपरिषद सभागृह, विधान भवन, नागपूर येथे “महाराष्ट्र विधिमंडळ संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्वपूर्ण योगदान” या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
देशातील संसदीय लोकशाहीच्या संदर्भात व्दिसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधानपरिषदेने उल्लेखनीय योगदान देत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविला आहे. माँटेग्यू-चेम्सफर्ड शिफारशीनुसार भारत सरकार अधिनियम, १९१९ अन्वये “Bombay Legislative Council” ची प्रारंभिक बैठक १९ फेब्रुवारी, १९२१ रोजी टाऊन हॉल, मुंबई येथे झाली. नारायण गणेश चंदावरकर यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी झालेली नियुक्ती ही एक ऐतिहासिक घटना होती. सन १८६२ ते सन १९२० पर्यंत Governor of Bombay यांच्या अध्यक्षतेखाली Council चे कामकाज चालत होते. सन १९२१ मध्ये नारायण चंदावरकर यांच्या रुपाने पहिल्यांदा भारतीय व्यक्तीची सभापती म्हणून नियुक्ती झाली. सन १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधानपरिषद शतकपूर्तीचा कालखंड मानता येईल. तथापि, कोविड – १९ महामारीमुळे (covid pandemic) त्यावेळी जाहीर कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही.
Also Read: आता शरद पवार गटाचे कार्यालयही बंडखोर गटाच्या ताब्यात