भाजपा नेत्यांनी केली पोलखोल
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या हिमाचल प्रदेश,तेलंगणा आणि कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांनी प्रत्यक्षात तेथील निवडणुकीत दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण न करता त्या राज्यांमधील जनतेची कशी फसवणूक केली याचा पंचनामा तेलंगणातील भाजपा नेते व केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी,कर्नाटक राज्यातील भाजपा नेत्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे आणि हिमाचल प्रदेशातील खा.माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सय्यद जफर इस्लाम, प्रेम शुक्ला, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश प्रवक्ते अतुल शहा उपस्थित होते.
काँग्रेसची खोटारडेपणाची गाडी आता फिरत फिरत महाराष्ट्रात आल्याचे सांगत शोभा करंदलाजे यांनी पाच गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसने तेलंगणा राज्यच दिवळखोरीत काढल्याचा आरोप यावेळी केला.पूर्वी कर्नाटक सरकारवर ४६ हजार कोटींचे कर्ज होते. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ते ८२ हजार कोटींवर पोहोचले.महिलांना मोफत बस प्रवास तसेच मोफत तांदूळ, मोफत वीज देऊ या केवळ घोषणाच राहिल्याचे सांगत गृहलक्ष्मी योजनाही फसवी निघाल्याचा आरोपही त्यांनी केला.
तेलंगणातील काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी महाराष्ट्रात येऊन खोटा प्रचार केला.तेथे त्यांचे राज्य येऊन ३४० दिवस झाले तरी निवडणुकीआधी सहा गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसने आतापर्यंत एकही आश्वासन पाळलेले नसल्याचे जी किशन रेड्डी यांनी यावेळी निदर्शनात आणत तेलंगणात काँग्रेस केवळ लूट करत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज माफ करणार असे आश्वासन काँग्रेसने दिले होते.मात्र अद्याप ४० टक्के शेतकऱ्यांचे देखील कर्ज माफ झालेले नाही.इतकेच काय एकरी १५ हजार रुपये देऊ अशी घोषणाही काँग्रेसने केली होती. हे आश्वासन न पाळता पूर्वी मिळत असलेले दहा हजार रुपयेही बंद केले.त्यातही महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करू म्हणाले त्यातून २५०० सोडाच एक रुपयाही मिळालेला नसल्याचे रेड्डी यांनी निदर्शनास आणले.
काँग्रेसने खोटे वादे आणि खोटे दावे करत जनतेला फसवण्याचे काम केले असे सांगत खा.अनुराग ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने खोटा प्रचार केला होता याची आठवण करून दिली.त्यांच्या संविधानाच्या प्रतीची पाने तशीच कोरी आहेत जशी त्यांची कामगिरीही.मात्र महायुतीचे संकल्प पत्र महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेणारे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
हिमाचल प्रदेशात दहा गॅरंटी घेऊन काँग्रेस आली होती.काँग्रेसने म्हटले होते आम्ही दोन रुपये किलो दराने शेण विकत घेऊ.मात्र आज दोन वर्षे झाली तरी आजवर दोन लोकांकडूनही खरेदी केलेली नाही.शंभर रुपये दराने दूध खरेदी करू म्हणाले होते.मात्र आजवर दोन लोकांकडूनही खरेदी केले नाही. महिलांना १५०० रुपये देण्याचे आश्वासन २३ लाख महिलांना दिले होते.मात्र २३ हजार महिलांनाही दिले नाहीत, अशा शब्दात खा.ठाकूर यांनी हिमाचल प्रदेश मधील वस्तुस्थिती कथन केली.
कुटुंबातील १८ पेक्षा जास्त वयाच्या चार महिलांना ही १५०० रुपये देण्याचे आश्वासनही काँग्रेसला पूर्ण करता आलेले नाही.३०० युनिट वीज मोफत देतो म्हणाले होते. ते सोडाच जे आम्ही १२५ युनिट वीज मोफत देत होतो तीही त्यांनी बंद केले.विजेचे दरही वाढवले. पेट्रोल आणि डिझेल वर व्हॉट लावत महागाई वाढवण्याचे काम केले असे सांगत काँग्रेस हे महावसुली आघाडी सरकार असल्याचा आरोपही खा. ठाकूर यांनी केला.युवकांना पाच लाख रोजगार देण्याच्या बाता केल्या.पण पाच हजारही नोकऱ्या काँग्रेस देऊ शकलेले नाही.फळांच्या किमतीही ठरवल्या नाहीत.प्रत्येक गावात मोबाइल क्लिनिक देऊ म्हणाले,तेही मिळाले नाहीत,असाही आरोप खा.ठाकूर यांनी केला.