महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारताची अभिमानास्पद आर्थिक आघाडी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

मुंबई:- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत लवकरच भारत चौथ्या क्रमांकावर असेल. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन करून या कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याबाबत शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट टाकून पंतप्रधानांना शुभेच्छा देताना, आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताची ही वाटचाल समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. ‘मेक इन इंडिया’ सारखा मंत्र देशाला देतानाच पंतप्रधान श्री. मोदीजी यांनी आत्मनिर्भरता, नावीन्यपूर्ण विचार व उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सर्वांगिण विकासाच्या दृष्टीमुळे भारत हे स्थान पटकावत असल्याचे म्हटले आहे. या ऐतिहासिक गोष्टींसाठी मी समस्त भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो, अशी पोस्ट शिंदे यांनी टाकली आहे.

एकीकडे भारताचे पाकिस्तानसोबतचे संबंध अत्यंत ताणलेले असताना आणि देशवासियांना मॉक ड्रिल करून युद्धसज्ज राहण्याचे आवाहन केले असतानाच देश आर्थिकदृष्ट्याही तितकाच भक्कम होत असल्याचा हा पुरावा आहे. त्यामुळे याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधानांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात