महाराष्ट्र ताज्या बातम्या

इराण–इस्रायल तणावामुळे ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक दुबईत अडकले

विमान सेवा बंद; भारतात परतण्यासाठी मदतीची मागणी

ठाणे: इराण–इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर परिणाम झाला असून, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३ नागरिक दुबईत अडकले आहेत. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि आज भारतात परतण्याचे नियोजन होते. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांचे विमान रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या गटामध्ये १२ ज्येष्ठ नागरिक आणि १२ महिला असून त्यांच्यासोबत टूर मॅनेजरचाही समावेश आहे. विमान सेवा तात्पुरती स्थगित झाल्यामुळे हे सर्व नागरिक दुबईत थांबले असून भारतात परतण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुबईत अडकलेल्या नागरिकांपैकी रमेश धलपे यांनी सांगितले की, या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, परिस्थितीवर लक्ष ठेवून संबंधित यंत्रणा आवश्यक ती पावले उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात