मुंबई –हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरु व हैदराबादकडे स्थलांतर करत असताना उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार झोपेत होते का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी यासंदर्भात अजित पवारांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
काँग्रेसच्या मते, पुण्याची औद्योगिक अधोगती, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि कोलमडलेली वाहतूक व्यवस्था यामुळे आयटी कंपन्या राज्याबाहेर जात आहेत.
“वेदांता फॉक्सकॉनसारखी मोठी गुंतवणूक गुजरातकडे गेली, आता हिंजवडीतील कंपन्याही जात आहेत. अजित पवार यांनी स्वतः कबुली दिली आहे, मग जबाबदारी कोणाची?” असे सपकाळ म्हणाले.
त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितले की, “हे सरकार केवळ हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून खोके गोळा करण्यात व्यस्त आहे. ही आका व खोके संस्कृतीच महाराष्ट्राला बरबाद करत आहे.”