महाराष्ट्र ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जयतु शंभू’ महोत्सव — सांस्कृतिक कार्य विभागाचा ऐतिहासिक उपक्रम

१४ मे रोजी सासवड येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम; ढोल-ताशा, मर्दानी खेळ, लोककलांचा संगम

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे, लेखणी आणि समशेर या दोन्हींचा समर्थ वापर करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे अधिकृतरीत्या साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने १४ मे २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता, सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात ‘जयतु शंभू’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून, मार्गदर्शन मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांचे लाभले आहे.

‘जयतु शंभू’ या कार्यक्रमात ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, वासुदेव, गोंधळी, तसेच अन्य पारंपरिक लोककलांची सादरीकरणे होतील. यामध्ये शंभरहून अधिक लोककलाकार भाग घेणार असून, शंभू राजांच्या शौर्य व समर्पणाची गाथा रंगमंचावर साकारली जाईल.

कार्यक्रमात स्नेहलता तावडे, तेजा देवकर, ऋतुराज फडके हे प्रमुख कलाकार सहभागी होणार असून, निवेदनाची जबाबदारी प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर सांभाळणार आहेत. नृत्यदिग्दर्शन राकेश अशोक शिर्के यांचे असेल.

या ऐतिहासिक सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन संचालक श्री. विभीषण चवरे यांनी सर्व शिवभक्त व शंभू भक्तांना केले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात