महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीच्या खासदारांची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे धाव; माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी

नवी दिल्ली: महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडीच्या खासदारांनी सांगितले की, माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं आणि असंवेदनशील वागणूक सतत चर्चेत असते. शेतकऱ्यांशी अरेरावीने बोलणे असो किंवा कर्जमाफीच्या संदर्भात असंवेदनशील विधान करणे असो, कोकाटे यांनी शेतकऱ्यांची सातत्याने थट्टा केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

आयत्या वेळेला राज्याच्या विधानसभेत गंभीर प्रश्नांवर चर्चा सुरू असताना ऑनलाईन रमी खेळण्याचा प्रकारही त्यांनी केल्याचे निदर्शनास आणून दिले. “हे वागणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय परंपरेला काळीमा फासणारे आहे,” असे महाविकास आघाडीच्या खासदारांनी सांगितले.

कोकाटे यांच्या असंवेदनशील वागणुकीमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत असून शेतकऱ्यांच्या हितालाही बाधा पोहोचत आहे. त्यामुळे कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांच्या जागी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला संवेदनशील मंत्री द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली.

या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही ही मागणी सोशल मीडियावर मांडली असून त्यांनी @ChouhanShivraj आणि @CMOMaharashtra यांना टॅग केले आहे.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात