महाड : महाड नगरपरिषद निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सर्व उमेदवारांनी आपल्या अर्जामध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली आहे. महाड नगरपरिषद निवडणूक विभागाकडून ही माहिती तपासून जाहीर नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात आली आहे, ज्यामुळे महाडकर नागरिकांना सर्व तपशील खुले स्वरूपात उपलब्ध झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठीची शैक्षणिक स्थिती
नगराध्यक्षपदासाठी एकूण ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे: एक उमेदवार वकील (कायदेपंडित), दोन उमेदवार मॅट्रिक पास आणि दोन उमेदवार नॉन-मॅट्रिक
गेल्या अनेक वर्षांनंतर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार, असा अंदाज व्यक्त होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोणत्याही उमेदवाराने विनंती केलेली नसल्याने सर्व उमेदवार रिंगणात राहणार आहेत.
नगरसेवक पदासाठी ५० उमेदवार — शैक्षणिक चित्र असे
महाड नगरपरिषदेसाठी ५० नगरसेवक उमेदवार रिंगणात असून त्यांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:
पदव्युत्तर(Post Graduate)
• पुरुष: २
• महिला: १
पदवीधर (Graduate)
• पुरुष: ४
• महिला: ९
अंडर ग्रॅज्युएट
• पुरुष: ७
• महिला: २
एसएससी (१०वी उत्तीर्ण)
• पुरुष: ८
• महिला: ३
अंडर एसएससी / नॉन-मॅट्रिक
• पुरुष: ८
• महिला: २
एकत्रित शैक्षणिक स्थिती (सर्व ५० उमेदवारांपैकी):
• पदवी व पदव्युत्तर = २० उमेदवार
• नॉन-ग्रॅज्युएट = १२ उमेदवार
• नॉन-मॅट्रिक = २१ उमेदवार
हे आकडे लक्षात घेतल्यास या निवडणुकीत उच्चशिक्षित, मध्यमशिक्षित आणि अशिक्षित अशा तिन्ही गटांतील उमेदवारांची लक्षणीय उपस्थिती आहे.
महाडकरांची पसंती कुणाला?
महाड ही ऐतिहासिक नगरपरिषद असून यापूर्वी अनेक मान्यवरांनी येथे लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले उमेदवार शैक्षणिक पात्रतेसह लौकिकदृष्ट्या जनतेसमोर उभे ठाकणार आहेत.
महाडकर कोणत्या उमेदवाराला शैक्षणिक पात्रतेच्या आधारे पसंती देतात, हे ३ डिसेंबरच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

