महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार जाहीर; आशाताई भोसले यांच्या सन्मानार्थ १२ पुरस्कार प्रदान होणार

मुंबई – महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचा वाटा उचललेल्या रेडिओ आणि आकाशवाणी या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार, निवेदक आणि तंत्रज्ञ घडले. या योगदानाच्या गौरवासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्रभूषण’ आशाताई भोसले यांच्या सन्मानार्थ ‘महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार’ दिले जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

मंत्रालयातील वार्ताहर कक्षात झालेल्या या पत्रकार परिषदेत मंत्री शेलार यांनी रेडिओ माध्यमाच्या गेल्या १०२ वर्षांतील सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेतला. येत्या २१ जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या पुरस्कारांमध्ये खालील प्रकारांचा समावेश आहे:
1. आशा रेडिओ जीवनगौरव पुरस्कार
2. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरस्कार
3. महाराष्ट्र आशा कम्युनिटी रेडिओ पुरस्कार
4. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन पुरस्कार
5. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सांस्कृतिक पुरस्कार
6. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट पुरुष निवेदक पुरस्कार
7. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार
8. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित निवेदक पुरस्कार
9. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट मराठी निवेदक पुरस्कार
10. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक सौहार्द पुरस्कार
11. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट स्टोरीटेलरिंग पुरस्कार
12. विशेष आशा पुरस्कार

मंत्री शेलार यांनी यावेळी सांगितले की, या महोत्सवात महाराष्ट्रभूषण आशाताई भोसले यांना वैयक्तिकरित्या निमंत्रण दिले जाणार असून, त्यांच्या उपस्थितीत या महोत्सवाला विशेष उजाळा मिळेल.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात