महाराष्ट्र

देशाचे पॉवर हाऊस होण्याची ताकद महाराष्ट्रात : एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

@NalawadeAnant

मुंबई: महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस (Power House) होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन असून आपलं ठाणं विकासाचं खणखणीत नाणं आहे, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे “मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत” “ठाणे विकास परिषद-२०२४” चे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण मुंबई महानगर प्रदेशात पाच सेक्टर्समध्ये जर धोरणात्मक काम केले तर आपली अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता या मुंबई महानगर प्रदेशात आहे.

ते म्हणाले, आज ठाणे जिल्हयाची अर्थव्यवस्था (economy of Thane) ४८ बिलियन डॉलर आहे. सन २०३० पर्यंत ती १५० बिलियन डॉलर होणे हे उद्दिष्ट असून ठाण्याचा जीडीपी ७.५ टक्के आहे, हा जीडीपी २० टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. 

देशाची जी एकूण गुंतवणूक आहे, त्यापैकी ५२ टक्के ही एकट्या महाराष्ट्राची आहे. दाओसला (Daos investment summit) जावून १ लाख ३७ कोटींच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. ३ लाख ५० हजार कोटींच्या सामंजस्य करारांवर (MoU) स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.  लवकरच इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर चीप (semiconductor chip) बनविण्याच्या प्रकल्पासाठी ८४ हजार कोटींचा करार होतोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पॉवर, स्टील, औषध निर्माण अशा विविध क्षेत्रातील उद्योग येत आहेत.

ठाणेमधील धोकादायक इमारतींचे (dilapidated buildings) सर्वेक्षण करून त्या इमारतींमधील सर्वांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या (Cluster Development) माध्यमातून हक्काचे घर देण्याचे काम सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यातील १७ हजार घरे बांधण्याचे काम वेगाने सुरु असल्याचा ठाम दावाही त्यांनी यावेळी केला. 

ठाण्यामध्ये विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातूनच खड्डेमुक्त रस्ते, सेंट्रल पार्क, ब्लू सी, एसटीपी प्लँट, प्रदूषणमुक्त पाणी यासारखे विविध उपक्रम सुरु आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात