ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोटाला चिमटा काढून एकवेळचं जेवून पुण्यात शिक्षण, मनसेचा पुढाकार; जेवणाचा खर्च उचलणार!

पुणे

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात राज्यभरातील गाव-शहरातील मुलं शिक्षणासाठी येत असतात. प्रत्येकाची घरची परिस्थिती अनुकूल नसते, मात्र गरीबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याने जसं शक्य होईल, तसं.. कधी एकवेळच जेवून मुलं शिक्षण घेत असतात.

16 वर्षांची ज्योत्स्ना सोळुंके पुण्यातील फग्युसन महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकतेय. कॉलेजच्या हॉस्टेलची फी परवडत नाही म्हणून ती एका घरात पेईंग गेस्ट म्हणून 18 मुलींसोबत शेअरिंगमध्ये राहतेय. बीडच्या तिच्या गावी आई, दोन लहान भावंड आणि आजी आजोबा राहतात. घरचं शेत आहे, पण दुष्काळात शेतात पीक नाही. त्यामुळे आई मजुरी करून पैसे कमावतेय. आईला त्रास नको म्हणून ज्योत्सा एकवेळचं जेवून काटकरस करतेय.. बीबीसी मराठीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं होतं.

ही कहाणी केवळ ज्योत्स्नाची नाही. पुण्यात अशा अनेक मुलं-मुली पोटाला चिमटा काढून शिक्षण घेत आहेत. अशा मुलींसाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. ज्योत्स्नाबरोबर आणखी दोन मुलींची जबाबदारी मनसेने घेतली आहे. त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या जेवणाच्या मेसचा खर्च पुणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उचलणार आहे.

मनसेने सोशल मीडियावरुन दिली माहिती
पोटाला चिमटा काढून शिक्षणासाठी एक वेळ जेवण करून काटकसर करत दिवस काढणाऱ्या पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थिनी ज्योत्स्ना सोळंके हिची व्यथा जेंव्हा बीबीसी न्यूज मराठीवर जेंव्हा समोर आली तेंव्हा लोकांच्या काळजाला घरं पडली. ही व्यथा पुणे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी तात्काळ फक्त ज्योत्सनाच नाही तर तिच्यासारख्या अडचणीतून मार्ग काढणाऱ्या इतर २ मुलींची जबाबदारी त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत घेतली. ह्या मुलींचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांच्या जेवणाच्या मेसचा खर्च पुणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उचलणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कामगिरीचं मनापासून कौतुक. विद्यार्थ्यांच्या हितासाठी, कायम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उभी राहते हे ब्रीद पुन्हा एकदा खरं करून दाखवलं

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात