महाराष्ट्र ताज्या बातम्या

परदेशातून चालवले जात होते एमडी ड्रग्सचे कारखाने; चार आरोपींचे प्रत्यार्पण करून अटक

MLA Amol Khatal raising MD drugs trafficking issue in Maharashtra Assembly

मुंबई  : परदेशात राहून हस्तकांमार्फत भारतात अंमली पदार्थांचे कारखाने चालवून मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या चार आरोपींचे प्रत्यार्पण करून त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तराद्वारे दिली.

आमदार अमोल खताळ यांच्यासह इतर पाच सदस्यांनी राज्यात, विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (ANTF) स्थापन करण्यात आली असून तिची सात युनिट्स कार्यरत आहेत.

सन २०२५ मध्ये ANTF आणि पोलिसांनी मिळून ५२३ कोटी १७ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले, तर १३४० कोटी ४१ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कालावधीत ३६५९ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

तसेच PITNDPS Act 1988 अंतर्गत राज्यात सहा आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले आहे. अंमली पदार्थ प्रकरणात सहभाग आढळल्याने अहिल्यानगर येथील एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहितीही लेखी उत्तरात देण्यात आली आहे.



Stay Ahead in Maharashtra Politics

महत्वाच्या राजकीय बातम्या, विश्लेषण आणि शोध पत्रकारिता थेट आपल्या ईमेलवर.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात